शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: भांडणात पतीकडून पत्नीचा गळा आवळून खून, पती फरार; इचलकरंजीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2024 12:17 IST

विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न

इचलकरंजी : येथील संग्राम चौक परिसरात पतीने बेदम मारहाण करून पत्नीचा गळा आवळून खून केला. करिश्मा किसन गोसावी (वय २५) असे मृताचे नाव आहे. ही घटना मंगळवारी रात्री उघडकीस आली. कौटुंबिक वादातून खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. खुनानंतर चादरीमध्ये मृतदेह झाकून तो विल्हेवाट लावण्यासाठी नेण्याचा प्रयत्न केला असावा, असा अंदाज घटनास्थळावरून पोलिसांनी वर्तवला.संग्राम चौकातील खासगी क्लासजवळ किसन हा पत्नी करिश्मा व तीन मुलांसोबत भाड्याच्या घरात दोन महिन्यांपूर्वीपासून राहत होता. या पती-पत्नीमध्ये वारंवार भांडण होत होते. सोमवारी रात्रीही त्यांच्यात जोरदार भांडण झाले. त्यावेळी किसन याने करिश्माला मारहाण केल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती. मंगळवारी किसन हा घराचा दरवाजा झाकून आतच बसत होता. त्याची दोन मुले मामा आकाश व नातेवाइकांकडून दोन वेळा घरी आली होती. त्यांनाही किसन याने घरात न घेता बाहेरूनच परत नातेवाइकांकडे पाठविले. दुपारनंतर किसन याने घराला कुलूप लावून पलायन केले.दरम्यान, दिवसभरात करिश्मा एकदाही घरी न आल्याने नातेवाइकांनी तिच्या घराकडे धाव घेतली. त्यावेळी घराला कुलूप होते. करिश्मा न आढळल्याने नातेवाइकांनी घराचे कुलूप तोडून आत पाहिले असता त्यांना करिश्माचा मृतदेह आढळला.याबाबत शिवाजीनगर पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता करिश्माला बेदम मारहाण करून किसन याने गळा आवळून खून केला असावा, असा अंदाज आला. नागरिकांसह नातेवाइकांनी घटनास्थळी गर्दी केली. गर्दीतून कसरत करत पोलिसांनी पंचनामा केला. मृतदेह विच्छेदनासाठी आयजीएम रुग्णालयात नेला. तेथेही नागरिकांनी रात्री उशिरापर्यंत मोठी गर्दी केली होती. या घटनेमुळे नातेवाइकांनी मोठा आक्रोश केला.

विल्हेवाट लावण्याचा प्रयत्नघटनास्थळावर आढळलेला मृतदेह चादरी व कपड्यांमध्ये झाकला होता. किसन दिवसभरातून वेळोवेळी घरातून बाहेर डोकावून पाहत होता आणि पुन्हा दरवाजा लावत होता. दाट लोकवस्तीचा भाग असल्याने नागरिकांनाही त्याच्या कृत्याचा संशय आला होता. पोलिसांनी परिसरातील एका सीसीटीव्हीची तपासणी केली. त्यामध्ये पहाटेच्या सुमारास किसन याने भंगार गोळा करण्याचा ढकलगाडा दारात आणून त्यावर काही बॉक्स ठेवल्याचे दिसून आले. त्यामुळे त्या गाड्यावरून नेऊन मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे.पथके रवानाकिसन याने दुपारनंतर पलायन केले. त्यामुळे त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी दोन पथके रवाना केली आहेत.तीन मुले पोरकीगोसावी यांना तीन मुले आहेत. त्यांतील एक मुलगा शिक्षणासाठी बाहेर आहे. दोन मुले त्यांच्यासोबत राहतात. ते बऱ्याच वेळा शेजारी राहणाऱ्या मामाकडेही जात असतात. आईचा मृत्यू आणि वडील फरार झाल्याने ही तिन्ही मुले पोरकी झाली आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसichalkaranji-acइचलकरंजी