पत्नी सोबत राहत नसल्याने पतीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:16 IST2021-07-05T04:16:04+5:302021-07-05T04:16:04+5:30
देवाळे : पत्नी सोबत राहत नसल्याच्या कारणावरून सातवे (ता. पन्हाळा) येथील माजी सरपंच गणेश यशवंत ...

पत्नी सोबत राहत नसल्याने पतीची आत्महत्या
देवाळे : पत्नी सोबत राहत नसल्याच्या कारणावरून सातवे (ता. पन्हाळा) येथील माजी सरपंच गणेश यशवंत हांडे (वय ४५) यांनी रविवारी सकाळी राहत्या घरी तुळईला दोरीने गळफास लावून घेत आत्महत्या केली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मयत गणेश यांची पत्नी व मुले गेल्या दोन-तीन वर्षांपासून सोबत नसल्याच्या नैराश्यातून घरी कोणीही नसल्याचे बघून त्यांनी घरातील तुळईला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. गणेश त्यांच्या पश्चात दोन मुले, विवाहित भाऊ असा परिवार आहे. भाऊ दीपक यशवंत हांडे यांच्या वर्दीवरून घटनेची नोंद कोडोली पोलिसात करण्यात आली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश काशीद करत आहेत.