शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर: बोरवडे येथे भरधाव ट्रकची दुचाकीला समोरुन धडक, पती-पत्नी जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 18:10 IST

देवदर्शन घेऊन घरी परताना काळाचा घाला.

बोरवडे : भरधाव वेगाने चुकिच्या दिशेने येणाऱ्या दहा चाकी ट्रकने दुचाकीला समोरुन जोराची धडक दिली. या भीषण अपघातात देवदर्शन घेवून घरी परतणाऱ्या पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. बोरवडे (ता.कागल) येथील फाट्या जवळ आज, शुक्रवारी दुपारच्या सुमारास हा अपघात झाला.भैरवनाथ आप्पासो पाटील (वय अंदाजे ४५) व त्यांची पत्नी पुनम (३८, रा.कोडणी, ता. निपाणी) अशी मृतांची नावे आहेत. मुरगूड व राधानगरी पोलिसांनी पाठलाग करीत ट्रक चालक विठ्ठल शिवाप्पा झिपरे (२५, रा.खडकलाट) याला खिंडी व्हरवडे (ता. राधानगरी) येथे पकडले.घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, भैरवनाथ पाटील पत्नी पुनम सोबत दुर्गमानवड येथील विठ्ठलाई देवीच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेवून ते गावी कोढणीकडे निघाले होते. याचदरम्यान राधानगरीकडे निघालेल्या दहाचाकी ट्रकने (के.ए.२२ सी.१९८१) चुकिच्या दिशेने येत पाटील यांच्या दुचाकी क्रमांक (के.ए.२३ ई.डी.५५३) ला समोरुन जोराची धडक दिली. अपघात इतका भीषण होता की दुचाकीस्वारांच्या मृतदेहाचे तुकडे झाले.अपघातानंतर ट्रकचालकाने घटनास्थळावरुन पळ काढला. या घटनेदरम्यान मुरगूड पोलीस मुधाळ तिट्यावर कार्यरत होते. अपघाताची माहिती मिळताच मुरगूड पोलिसांनी ट्रकचा पाठलाग केला. राधानगरी पोलिसांच्या सहकार्याने खिंडी व्हरवडे येथे ट्रक चालकाला पकडून राधानगरी पोलिसांनी ताब्यात घेतले.अधिक तपास मुरगूड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कुमार ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली संदिप ढेकळे, सचिन निकाडे, रमेश शेंडगे, राम पाडळकर , स्वप्नील मोरे, हिंदुराव परीट करीत आहेत. मृत भैरवनाथ पाटील यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघात