हुपरीत तलाठ्यास लाच स्वीकारताना पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:24 IST2021-03-31T04:24:25+5:302021-03-31T04:24:25+5:30

संतोष सुभाष उपाध्ये (रा. केडीसीसी बँकेसमोर कुरुंदवाड, ता शिरोळ, कोल्हापूर) असे त्याचे नांव आहे. याबाबत समजलेली माहिती अशी, तक्रारदार ...

Huprit Talatha was caught accepting a bribe | हुपरीत तलाठ्यास लाच स्वीकारताना पकडले

हुपरीत तलाठ्यास लाच स्वीकारताना पकडले

संतोष सुभाष उपाध्ये (रा. केडीसीसी बँकेसमोर कुरुंदवाड, ता शिरोळ, कोल्हापूर) असे त्याचे नांव आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी, तक्रारदार यांचा विट भट्टीचा व्यवसाय आहे. त्यासाठी त्यांना तांबड्या मातीची जास्त आवश्यकता असते. या मातीचे शासकीय गायरानातून उत्खनन करणे गरजेचे असते. त्यासाठी शासन नियमाप्रमाणे महसूल विभागात रॉयल्टी भरावी लागते. ही रॉयल्टी भरण्यासाठी तलाठी, मंडल अधिकारी व तहसीलदार कार्यालयाची रितसर परवानगी घ्यावी लागते. ही परवानगी देण्यासाठी तलाठी संतोष उपाध्ये यांनी सुरुवातीस ३० हजार रुपयांची मागणी तक्रारदार यांच्याकडे केली होती. यामध्ये तडजोड होऊन २५हजार रुपये देण्याचा तोडगा निघाला होता.

दरम्यानच्या कालावधीत तक्रारदार याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून याबाबतची तक्रार दाखल केली होती. तलाठी संतोष उपाध्ये यांस मंगळवारी लाचेची रक्कम देण्याचे ठरले होते. त्यानुसार ही रक्कम स्वीकारत असतांना त्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. या कारवाईमध्ये पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत, पोलीस निरीक्षक युवराज सरनोबत, सहाय्यक फौजदार बबंरगेकर, पोलीस नाईक सुनील घोसाळकर, कृष्णात पाटील, रूपेश माने यांचा सहभाग होता.

३० संतोष सुभाष उपाध्ये

Web Title: Huprit Talatha was caught accepting a bribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.