शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

कुसूर, तारूखच्या डोंगरात प्राण्यांसह पक्ष्यांची शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 00:23 IST

कुसूर : कऱ्हाड तालुक्यातील कुसूर तसेच तारूख परिसरातील डोंगर बंदूकधारी शिकाºयांकडून पिंजला जातोय. दिवसा आणि रात्रीही येथे शिकारी केल्या जात आहेत.

ठळक मुद्देबंदूकधारी शिकाऱ्यांमुळे शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण- टोळीचा वावर

गणेश काटेकर ।कुसूर : कऱ्हाड तालुक्यातील कुसूर तसेच तारूख परिसरातील डोंगर बंदूकधारी शिकाºयांकडून पिंजला जातोय. दिवसा आणि रात्रीही येथे शिकारी केल्या जात आहेत. मात्र, या शिकाऱ्यांना कसलीही भीती नसल्याने शिवारात काम करणाºया शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

कुसूरसह तारूख विभाग संपूर्ण डोंगराने वेढला आहे. डोंगरात घनदाट झाडी असल्याने वन्य प्राण्यांची संख्याही समाधानकारक आहे. परिणामी वन्य प्राण्यांची शिकार करणाºयांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. स्थानिकांनपेक्षा बाहेरील अनोळखी बंदूकधारी शिकाºयांचा वावर वाढलेला दिसतो. हे शिकारी सावजासाठी रात्रीच काय पण दिवसाही उघड्यावर बंदूक घेऊन फिरताना दिसत आहेत. त्यांना कसलाही धाक अथवा भीती दिसत नाही. परिणामी शिवारात सावजाची शिकार करताना अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

डोंगरात घनदाट झाडी असल्यामुळे वन्य प्राण्यांची संख्या चांगलीच वाढताना दिसत आहे. बिबट्या, साळींदर, ससा, कोल्हा, खवले मांजर, मोर-लांडोर, रानडुक्कर आदी वन्यप्राण्यांची संख्या चांगली आहे. सध्या डोंगरतील खाद्य, पाणी कमी झाल्याने या प्राण्यांनी खाद्याच्या शोधात आपला मोर्चा डोंगर पायथ्यालगतच्या बागायती शिवारात वळविला असल्याने अनेकदा रस्ता ओलंडताना या प्राण्यांचे दर्शन लोकांना होत आहे. हीच संधी साधून जिभेचे चोचले भागविण्यासाठी काही लोकांनी वन्य प्राण्यांना आपले लक्ष्य बनवले आहे. मोर, लांडोरी पक्ष्यांना दिवसा टिपले जात आहे. तर ससे, साळींदर, खवले मांजर, रानडुक्कर यांचा माग घेऊन रात्रीच्या वेळी कधी जाळ्यात तर कधी बंदुकीच्या निशाण्यावर टिपले जात आहे.

शिकाऱ्यांच्या या वर्तनामुळे शेतात काम करणारा शेतकरीच सावज होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उघड्यावर बंदूक घेऊन फिरणारे हे शिकारी वनविभागाच्या निदर्शनास आले नसतील का?असाही सवाल उपस्थित केला जात आहे.रिक्षाच्या केबलचा शिकारीसाठी वापरसध्या सोशल मीडियावर पशु-पक्षांना पकडण्यासाठी नवनवीन शक्कल लढवून त्यांना जाळ्यात ओढल्याचे व्हिडीओ सर्रास दाखवले जात आहेत. त्याचप्रमाणे अनेक शिकाºयांकडून हे प्रयोग केले जात आहेत. तर सर्वात जास्त रिक्षांना वापरण्यात येणाºया केबलचा फास तयार करून पशुपक्ष्यांची शिकार केली जात असल्याचे दिसून येत आहे.साळींदर पकडण्यासाठी त्याने काढलेल्या बिळाच्या तोंडावर तारेचा फास तयार करून ठेवला जातो तर दुसरीकडे असलेल्या बिळाच्या तोंडावर आग पेटवून धूर सोडला जातो. धुरामुळे साळींदर बाहेर पडते आणि अलगद फासामधे अडकते. मात्र उन्हामुळे डोंगरातील पालापाखोळा वाळल्यामुळे लगेच पेट घेऊन डोंगरांना वणवे लागत आहेत. परिणामी वनसंपत्ती नष्ट होत आहे.