शहरं
Join us  
Trending Stories
1
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
2
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
3
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
4
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
5
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
6
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
7
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
8
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
9
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
10
स्वाती मालिवाल यांच्यासोबत गैरवर्तन झालं, AAP ने दिली कबुली, दोषींवर केजरीवाल करणार कठोर कारवाई
11
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
12
T20 World Cup मध्ये भारताची डोकेदुखी वाढवणारी बातमी! ICC च्या नियमामुळे गोंधळ 
13
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
14
लवंगाचे पाणी आरोग्यासाठी रामबाण, मिळतील आश्चर्यकारक फायदे!
15
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
16
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."
17
Narendra Modi : "केरळने धडा शिकवला, उत्तर प्रदेशच्या जनतेनेही ओळखलंय"; मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला
18
सैन्यातील नोकरी सोडून गाझातल्या लोकांच्या मदतीसाठी धावले; इस्रायलच्या हल्ल्यात वैभव काळेंचा मृत्यू
19
Akhilesh Yadav : "भाजपाने Google वर 100 कोटींचा प्रचार करण्याचा रेकॉर्ड केला... हा जनतेचा पैसा"
20
यामिनी जाधव, वायकरांना उमेदवारी का दिली? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'त्यांची चूक असती तर मी...'

‘लोकमत महामॅरेथॉन’ नोंदणी हाऊसफुल्ल; नाद खुळा प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 2:53 PM

‘आरोग्यम् धनसंपदा’ अर्थात आरोग्य तंदुरुस्त असेल तर आपण कितीही धन कमावू शकतो. स्वप्नांचे इमले सत्यातही उतरवू शकतो. हाच धागा पकडून ‘लोकमत’ समूहाने राज्यात सुरू केलेल्या ‘धावा आरोग्यासाठी’ या संकल्पनेवर आधारित ‘लोकमत महामॅरेथॉन’चे तिसरे पर्व कोल्हापुरात रविवारी, दि. ५ जानेवारी २०२० रोजी होत आहे.

ठळक मुद्देधावपटूंना मिळणार रंगीत मेडलतिसऱ्या पर्वातील नोंदणीला अखेरच्या दिवशीही रांगाच रांगा

कोल्हापूर : ‘आरोग्यम् धनसंपदा’ अर्थात आरोग्य तंदुरुस्त असेल तर आपण कितीही धन कमावू शकतो. स्वप्नांचे इमले सत्यातही उतरवू शकतो. हाच धागा पकडून ‘लोकमत’ समूहाने राज्यात सुरू केलेल्या ‘धावा आरोग्यासाठी’ या संकल्पनेवर आधारित ‘लोकमत महामॅरेथॉन’चे तिसरे पर्व कोल्हापुरात रविवारी, दि. ५ जानेवारी २०२० रोजी होत आहे.

त्याच्या नावनोंदणीला सर्वसामान्य, आबालवृद्ध, धावपटू आणि कोल्हापूरकरांचा उदंड प्रतिसाद लाभला असून, नोंदणीच्या अखेरच्या दिवशी सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी नोंदणीसाठी ‘लोकमत’च्या कार्यालयात रांगाच रांगा लावल्या होत्या. अखेरच्या दिवशी ‘न भूतो ना भविष्यति’ असा प्रतिसाद कोल्हापूरकरांनी दिल्याने नोंदणी अक्षरश: हाऊसफुल्ल झाली.कोल्हापुरातील पोलीस मैदानात होणाऱ्या या मॅरेथॉनकरिता विविध पाच गटांतील विजेत्यांना एकूण सहा लाखांची बक्षिसे जिंकण्याची संधी आहे. या वर्षी होणाऱ्या मॅरेथॉनचे आणखी एक वैशिष्ट्य असून, त्यामध्ये सहभागी होणाºया प्रत्येक धावपटूला आकर्षक आणि रंगीत मेडल मिळणार आहे.

कोल्हापूरची नवी ओळख असणाऱ्या ‘लोकमत महामॅरेथॉन’मध्ये १२ वर्षांपेक्षा जास्त आणि धावण्याचा छंद असणाऱ्यांसाठी ‘फन रन,’ १६ वर्षांपेक्षा जास्त वर्षांवरील व्यक्तींसाठी १० किलोमीटरची ‘पॉवर रन’ होणार आहे. १८ वर्षांवरील व्यक्तींसाठी २१ किलोमीटरचा गट आणि तीन किलोमीटरची ‘फॅमिली रन’ आणि पाच किलोमीटर अंतराचा स्वतंत्र गट आहे.

सर्व वयोगटांतील व्यक्तींना त्यामध्ये सहभागी होता येईल. सैन्य आणि पोलीस दलातील धावपटूंसाठी २१ किलोमीटरचा ‘डिफेन्स’ हा वेगळा गट आहे. कोल्हापूरकरांच्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे नोंदणीची प्रक्रिया आता पूर्णत: थांबविण्यात आली आहे.

अधिक माहितीसाठी येथे संपर्क साधाया महामॅरेथॉनसंबंधी अधिक माहितीकरिता वेबसाईटला भेट द्यावी किंवा लोकमत शहर कार्यालय, कोंडा ओळ, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर; मोबाईल नंबर ९६३७३३०७०० अथवा ९७६७२६४८८५ वर संपर्क साधावा.

प्रकार, मिळणारे साहित्य

  • ३ किलोमीटर (फॅमिली रन) टी-शर्ट, गुडीबॅग, मेडल, ब्रेकफास्ट
  • ५ किलोमीटर (फन रन) टी-शर्ट, गुडीबॅग, मेडल, ब्रेकफास्ट
  • १० किलोमीटर (पॉवर रन) टी-शर्ट, गुडीबॅग, सर्टिफिकेट, मेडल, टाईम चिप, ब्रेकफास्ट
  • २१ किलोमीटर (हाफ मॅरेथॉन) टी-शर्ट, गुडीबॅग, सर्टिफिकेट, मेडल, टाईम चिप, ब्रेकफास्ट
  • २१ किलोमीटर (डिफेन्स गट) टी-शर्ट, गुडीबॅग, सर्टिफिकेट, मेडल, टाईम चिप, ब्रेकफास्ट

मानसिक, शारीरिक संतुलनासाठी उत्तममॅरेथॉनमुळे शारीरिक व मानसिक असे दोन्ही संतुलन राहते. धावण्यामुळे वजन घटते. शारीरिक ताण कमी होण्यास मदत होते. मानसिक ताण तर आपोआप कमी होतोच व मनही प्रसन्न राहते. रोजच्या धावण्यामुळे व जॉगिंगमुळे तर आपण खूपच निरोगी राहतो. त्यामुळे ‘लोकमत’ने सामाजिक भान राखून ‘महामॅरेथॉन’चा उपक्रम राबविला आहे. त्यासाठी ‘लोकमत’चे विशेष कौतुक व भरघोस शुभेच्छा! सर्वांनी आपल्या शारीरिक तंदुरुस्तीसाठी या मॅरेथॉनमध्ये सहभागी व्हावे.- अनिल गुरव, साहाय्यक कामगार आयुक्त, कोल्हापूर

‘लोकमत महामॅरेथॉन’चा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य व लोकोपयोगी आहे. प्रत्येकाने आरोग्याची काळजी घेण्यासाठी धावणे हा सर्वोत्तम व्यायाम प्रकार अवलंबला तर प्रत्येकाला सुदृढ शरीरसंपदा लाभेल. महामॅरेथॉनसारख्या उपक्रमामुळे दरवर्षी धावण्यासारख्या चांगल्या सवयीने प्रत्येक पिढीला नवीन वळण लागेल.- डॉ. संजय देसाई,

युवापिढीला नवचैतन्य देणारी महामॅरेथॉनधावपळीच्या युगात ‘लोकमत’चा हा उपक्रम तरुणांसह आबालवृद्धांना नवचैतन्य देणारा आहे. खेळ आणि व्यायामाद्वारे आपले आरोग्य जपता येते. ताणतणावातून शरीराला मुक्ती मिळते. महामॅरेथॉनचा उपक्रम लोकांना प्रेरणा देण्याबरोबरच एक सामाजिक बांधीलकी जपणारा आहे. मी स्वत: सहभागी होणारच आहे. तुम्हीही मागे राहू नका.- विराज पाटील, करवीर तालुकाप्रमुख, शिवसेना 

मी धावणार.... तुम्हीही धावा‘लोकमत’चा ५ जानेवारी रोजी होणारा महामॅरेथॉनचा उपक्रम स्तुत्य असून, या स्पर्धेत मीही धावणार आहे. मी या स्पर्धेची तयारी करीत असून रोज पाच किलोमीटर धावतो. त्याचबरोबरच रोज सकाळी व सायंकाळी योगासने करतो. सध्याच्या धावपळीच्या युगात व्यायामच माणसाचे आयुष्य वाचवू शकतो. महामॅरेथॉनच्या माध्यमातून सर्वच वयोगटांतील लोकांना धावण्यासाठी प्रोत्साहन मिळते. मी प्रत्येक वर्षी सहभागी होतो. या वर्षीही सहभागी होणार असून, जिल्ह्यातील सर्व वयोगटांतील लोकांनी यामध्ये सहभागी व्हावे.- विश्वास पाटील, ज्येष्ठ संचालक, गोकुळ

 

टॅग्स :lokmat mahamarathon kolhapur 2020लोकमत महामॅरेथॉन कोल्हापूर 2020kolhapurकोल्हापूर