शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
3
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
4
Top Marathi News Live: उत्तर महाराष्ट्र अन् मराठवाड्याला 'हीट वेव्ह'चा इशारा; मुंबईसह उत्तर कोकणात उकाडा असह्य होणार
5
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
6
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
7
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
8
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
9
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
10
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
11
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
12
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
13
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
14
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
15
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
16
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
17
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
18
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
19
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
Daily Top 2Weekly Top 5

शिंदेवाडीच्या ‘बिनघंटे’च्या शाळेची घंटा बंदच

By admin | Updated: September 6, 2015 23:29 IST

वाद न्यायालयात : मुले शाळेत पाठविणे बंद; मुलांचे दाखले द्या : पालकांची भूमिका

गारगोटी : राज्यात ‘बिनघंटे’ची शाळा म्हणून नावारूपास आलेली भुदरगड तालुक्यातील शिंदेवाडी येथील प्राथमिक शाळा सध्या मुख्याध्यापिका विरुद्ध प्रशासन, ग्रामस्थ आणि सहायक शिक्षक अशा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. तर ग्रामस्थांनी २४ आॅगस्टपासून आपले पाल्य या शाळेत पाठविणे बंद करून एक वेगळाच ‘एल्गार’ केला आहे.सकाळी सात ते रात्री आठ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांसाठी खुली ठेवून त्यांचा बौद्धिक व सर्वांगीण विकास व्हावा म्हणून अहोरात्र काम करून ही शाळा येथील देवेकर व गुरव या दोन शिक्षकांनी नावारूपाला आणली. नवनवीन उपक्रमांसह शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश मिळवित येथील विद्यार्थ्यांनीही चांगलीच प्रगती केली. याची दखल जिल्हा परिषद शिक्षण विभागाने घेतली. तर राज्यातील अनेक शाळा, अधिकारी यांनी वेळोवेळी या शाळेस भेटी देऊन बिनघंटेची संकल्पना समजून घेतली. शाळेचा नावलौकिक आणि शिक्षकांचे प्रामाणिक कष्ट पाहून गारगोटी येथील पालकांनी आपल्या मुलांना या शाळेत घालण्यास प्राधान्य दिले. शिंदेवाडी व्यतिरिक्त गारगोटी व परिसरातील विद्यार्थी या शाळेत येऊ लागले. त्याचा परिणाम पट संख्येवर झाला. पटसंख्या वाढल्याने ९ जानेवारी २0१५ ला समायोजन पद्धतीने सुनीता कालेकर यांची मुख्याध्यापक म्हणून नेमणूक झाली; पण त्यांच्या कार्यप्रणालीवर ग्रामस्थ नाराज होते. त्यांनी त्यांच्या बदलीची मागणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली. त्यांची कार्यपद्धती तपासण्यासाठी गटशिक्षणाधिकाऱ्यांना आदेश दिले गेले.या तपासणीत कालेकर दोषी आढळल्या की नाही, हे गुलदस्त्यात आहे. मात्र, त्यांच्यावर सहकारी शिक्षकांशी वाद घालणे, विद्यार्थ्यांना शिकविण्यात कुचराई करणे, जाणीवपूर्वक शाळेतील उपक्रम बंद पाडणे, असे आरोप होते. त्यांच्यावर शिक्षण विभागाने कारवाई केल्यानंतर त्या न्यायालयात गेल्या. त्यांनी सरकारी शिक्षक शालेय व्यवस्थापन समिती यांच्यासह आणखी चार अधिकाऱ्यांना न्यायालयात खेचले.सध्या ग्रामस्थ व मुख्याध्यापिका सुनीता कालेकर यांच्यातील वाद इतका विकोपाला गेला आहे की, ग्रामस्थांनी न्यायालयाचा मान राखत कालेकर यांची बदली करा म्हणण्या ऐवजी आपल्या पाल्यांचे दाखले द्या, असा सूर लावून सोमवारपासून एकाही विद्यार्थ्यांला शाळेत पाठविले नाही. शिवाय या मुख्याध्यापिकेची बदली झाल्याखेरीज मुले शाळेत पाठवणार नाही, अशी ठाम भूमिका पालकांनी घेतली आहे.नावाजलेल्या शाळेची वाताहत होत असलेली पाहून पालकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत गटशिक्षणाधिकारी एम. एस. मांडे यांच्याशी संपर्क साभला असता ते म्हणाले, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तपास अहवाल पाठविला असून, ते योग्य तो निर्णय घेतील. याबाबत थोड्या तांत्रिक अडचणी आहेत. त्या दूर करून लवकर निर्णय होईल. गटविकास अधिकारी आणि जिल्हा परिषद सदस्य प्रा. अर्जुन आबिटकर यांनी ग्रामस्थांना मुले शाळेत पाठविण्याची विनंती केली आहे; पण ग्रामस्थ आपल्या मतावर ठाम आहेत. (वार्ताहर)