शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात कडकडीत ऊन; पाण्याखाली गेलेले ११ बंधारे खुले, धरण क्षेत्रातही पाऊस झाला कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 11:56 IST

धरण क्षेत्रातही पाऊस कमी झाल्याने विसर्ग कमी झाल्याने नद्यांची पातळी झपाट्याने कमी

कोल्हापूर : जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभर कडकडीत ऊन पडले होते. धरण क्षेत्रातही पाऊस कमी झाल्याने विसर्ग कमी झाल्याने नद्यांची पातळी झपाट्याने कमी होत आहे. दिवसभरात विविध नद्यांवरील ११ बंधारे मोकळे झाले असून, अद्याप १८ बंधारे पाण्याखाली आहेत.गेल्या दोन-तीन दिवसांपासून पाऊस कमी झाला आहे. गुरुवारी दिवसभर उघडीप राहिली. शुक्रवारी गगनबावडा, पन्हाळा, शाहूवाडी, राधानगरी तालुक्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. मात्र, कोल्हापूर शहरासह इतर ठिकाणी सकाळपासूनच ऊन राहिले. बऱ्याच दिवसांनी पूर्ण दिवसभर आकाश मोकळे दिसत होते.दरम्यान, शुक्रवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी २.७ मिलिमीटर पाऊस झाला. सर्वाधिक १५.२ मिलिमीटर गगनबावडा तालुक्यात झाला. राधानगरी धरणातून प्रतिसेकंद ३१००, वारणातून ४५००, तर दूधगंगेतून १६०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे.अंग भाजणारे ऊन..शुक्रवारी कोल्हापूर जिल्ह्याचे किमान तापमान २४, तर कमाल २९ डिग्रीपर्यंत राहिले. किमान तापमान वाढल्याने वातावरणात उष्मा जाणवत होता. त्यामुळे सकाळी दहा वाजताच अंग भाजून निघत होते.रोप लागणींची धांदलमध्यंतरीच्या एकसारख्या पावसाने भात, नागलीची रोप लागण थांबली होती. गेल्या आठ दिवसांपासून उघडझाप सुरू असल्याने रोपांची वाढ चांगली झाली आहे. त्यामुळे सध्या जिल्ह्याच्या पश्चिमेकडील तालुक्यात रोप लागणीची धांदल उडाली आहे.