शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

आशा, गटप्रवर्तक महिलांचा थकीत प्रोत्साहन भत्ता द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:23 IST

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कार्यरत असणाऱ्या २७७५ आशा आणि १४० गटप्रवर्तक महिलांना १ मे २०२० पासून ...

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कार्यरत असणाऱ्या २७७५ आशा आणि १४० गटप्रवर्तक महिलांना १ मे २०२० पासून कोरोना महामारीच्या काळातील साडेतीन कोटी रुपयांचा प्रोत्साहन भत्ता देणे थकीत आहे. हा भत्ता तातडीने द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र आशा वर्कर्स, गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीने प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने यांच्याकडे करण्यात आली. याबाबतची तरतूद पाहून निर्णय घेऊ, असे आश्वासन माने यांनी दिले.

आरोग्य विभागाकडून ३१ मार्च २०२० रोजी कोविड काळात काम करणाऱ्या आशा, गटप्रवर्तक महिला व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांना सर्व ग्रामपंचायतींनी दरमहा एक हजार रुपये प्रोत्साहन भत्ता द्यावा, असा आदेश काढण्यात आला होता. याबाबत अन्य जिल्हा परिषदांनी आदेश काढून असा भत्ता देण्याच्या सूचना दिल्या; परंतु कोल्हापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तारीख पाच जून २०२० रोजीच्या एका आदेशानुसार या आदेशाची अंमलबजावणी करून नये, असे पत्र दिले. त्यामुळे केवळ एक महिन्याचाच भत्ता मिळाला असून उर्वरित साडेतीन कोटी रुपयांचा भत्ता थकीत आहे. कुष्ठरोग शोधमोहिमेमध्ये आशा व गटप्रवर्तक महिलांनी काम करूनही त्याचा मोबदला अद्याप मिळालेला नाही. तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी या कामाचा मोबदला देत असताना पन्नास कुटुंबांना भेट दिली असेल तरच दीडशे रुपये दिले आहेत त्यामध्ये ही केलेल्या कामाइतका मोबदला दिलेला नाही. यासह अन्य मागण्यांची पूर्तता झाली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.

शिष्टमंडळामध्ये संघटनेचे अध्यक्ष कॉ. शंकर पुजारी, पूजा लाड, राणी लाड, वनिता खोडके, नीता बेले, अंजली पडियार, अरुणा कांबळे, कॉ. विजय बचाटे, रूपाली पाटील, सरिता लाड, संगीता लाड यांचा समावेश होता.