शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

एशियाडमध्ये वीरधवल, राहीकडून कोल्हापूरकरांना पदकाच्या आशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 17:31 IST

जाकार्ता (इंडोनेशिया) येथे सुरू असलेल्या आशियार्ई स्पर्धेत आॅलिम्पिकवीर गोल्डन बॉय जलतरणपटू वीरधवल खाडे, सुवर्णकन्या नेमबाज राही सरनोबत या दोघांकडून पदक जिंकण्याच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत. सांघिक स्पर्धेसाठी यंदाही या दोघांची निवड झाली आहे.

ठळक मुद्देएशियाडमध्ये वीरधवल, राहीकडून कोल्हापूरकरांना पदकाच्या आशाजाकार्ता (इंडोनेशिया) येथे सुरू असलेल्या आशियार्ई स्पर्धेत दोघांची निवड

कोल्हापूर : जाकार्ता (इंडोनेशिया) येथे सुरू असलेल्या आशियार्ई स्पर्धेत आॅलिम्पिकवीर गोल्डन बॉय जलतरणपटू वीरधवल खाडे, सुवर्णकन्या नेमबाज राही सरनोबत या दोघांकडून पदक जिंकण्याच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत. सांघिक स्पर्धेसाठी यंदाही या दोघांची निवड झाली आहे.देशाचा गोल्डनबॉय ठरलेल्या आॅलिम्पिकवीर वीरधवलने यापूर्वी २००६ मध्ये सहा सुवर्णपदकांसह पाच राष्ट्रीय विक्रमांची नोंद केली होती. यासह त्याने युवा राष्ट्रकुल, आशियाई, तसेच राष्ट्रकुल अशा आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धांमध्ये भारताचे अनेक वेळा प्रतिनिधित्व करीत सुवर्णपदकाची कमाई केली आहे.

यात त्याने ५० मीटर, १०० मीटर, २०० मीटर व ४०० मीटर फ्रीस्टाईल व ५० मीटर बटरफ्लाय अशा जलतरण प्रकारांत त्याने चमकदार कामगिरी केली आहे. त्याच्या या कामगिरीची दखल घेत सरकारने त्याला अर्जुनवीर सन्मानानेही गौरविले आहे. सध्या तो राज्य शासनाच्या महसुल विभागात तहसीलदार पदावर कार्यरत आहे.

जागतिक स्पर्धेत दीर्घकालानंतर अर्थात तो चार वर्षांनंतर सहभाग घेत आहे. भारतीय संघ निवड चाचणीतही त्याने चमकदार कामगिरी केली. ती कामगिरी पाहता यंदा ४ बाय १०० फ्रीस्टाईल रिले व ४ बाय २०० फ्रीस्टाईल रिलेमध्ये समावेश झाला आहे.त्याच्यासोबत कोल्हापूरची राही सरनोबत हिनेही नेमबाजी स्पर्धेत कोल्हापूरकरांची परंपरा सुरू ठेवत आगेकूच केली आहे. तिने तेजस्विनी सावंत हिच्या पाउलावर पाऊल ठेवत कामगिरीचा आलेख उंचावला आहे. यापूर्वी तिने २०१० साली राष्ट्रकुल स्पर्धेत एक सुवर्ण, रौप्य, तर २०११ च्या आयएसएफ विश्वचषक शुटिंग स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली आहे.

याच कामगिरीच्या जोरावर तिने आॅलिम्पिकचे तिकीटही पटकावले. २०१३ मध्ये तिने विश्वचषक शुटिंग स्पर्धेत सुवर्ण, तर २०१४ मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत पुन्हा सुवर्णचा वेध घेत देशाच्या मानात शिरपेच खोवला.

सातत्यपूर्ण कामगिरीची दखल घेत पुन्हा एकदा तिची इंडोनेशिया येथे सुरू असलेल्या आशियाई स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. ती २५ मीटर पिस्तुल प्रकारात पुन्हा एकदा सहभागी झाली आहे. त्यामुळे यंदाच्या आशियाई स्पर्धेत सुवर्णकन्या राही व गोल्डनबॉय वीरधवल यांच्याकडून पदक विजयाच्या अपेक्षा कोल्हापूरच्या क्रीडा रसिकांच्या पुन्हा एकदा निर्माण झाल्या आहेत. 

 

टॅग्स :Asian Games 2018आशियाई स्पर्धाSportsक्रीडाkolhapurकोल्हापूर