सहायक पोलीस निरीक्षक किशोर डोईजड यांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:23 IST2021-05-14T04:23:27+5:302021-05-14T04:23:27+5:30

नवे पारगाव : नवे पारगाव (ता. हातकणंगले) येथील मुंबईच्या विलेपार्ले पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक किशोर मनोहर डोईजड यांना ...

Honoring Assistant Inspector of Police Kishor Doijad | सहायक पोलीस निरीक्षक किशोर डोईजड यांचा सन्मान

सहायक पोलीस निरीक्षक किशोर डोईजड यांचा सन्मान

नवे पारगाव : नवे पारगाव (ता. हातकणंगले) येथील मुंबईच्या विलेपार्ले पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक किशोर मनोहर डोईजड यांना उल्लेखनीय कामगिरीबद्दल बृहन्मुंबईचे पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे - पाटील यांच्या हस्ते सन्मानित केले.

सहायक पोलीस निरीक्षक किशोर डोईजड व त्यांच्या सहकाऱ्यांच्या पथकाने चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून ७ कोटी १० लाख ७८ हजार रोख रक्कम, ४८ लाख ५० हजार हजारांची वाहने व ११ लाख ४८ हजारचे दागिने असे मिळून ७ कोटी ७० लाख ७६ हजार जप्त केले. त्यांच्या पथकाने उच्च प्रतीचे कौशल्य दाखवून सन २०२१ मधील हा गुन्हा काही महिन्यांतच उघडकीस आणून उल्लेखनीय काम केले. या कामगिरीबद्दल त्यांच्या पथकाचा सन्मान केला.

१३ किशोर डोईजड

फोटो ओळी : नवे पारगाव (ता. हातकणंगले) येथील सहायक पोलीस निरीक्षक किशोर डोईजड यांना प्रशंसापत्र देऊन सन्मानित करताना बृहन्मुंबईचे पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील.

Web Title: Honoring Assistant Inspector of Police Kishor Doijad