गुरुजींचा आदर, सन्मान करूया!
By Admin | Updated: September 5, 2014 00:38 IST2014-09-05T00:27:30+5:302014-09-05T00:38:26+5:30
तरुणाईच्या भावना : आयुष्यात शिक्षकांचे मोठे स्थान

गुरुजींचा आदर, सन्मान करूया!
प्रदीप शिंदे - कोल्हापूर-- आज माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस... हा दिवस ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’तर्फे शहरातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांकडून शिक्षकांबद्दलची मते जाणून घेण्यात आली.
त्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांच्या मते, भविष्यातले विचारवंत, कलाकार, लेखक, तत्त्वज्ञ, पुढारी, डॉक्टर, प्राध्यापक, इंजिनियर, शास्त्रज्ञ तयार करण्याचे सामर्थ्य शिक्षकांमध्ये असते. शिक्षक हे आपल्याला केवळ पुस्तकी ज्ञान शिकवत नाहीत तर जगण्याच्या कलेसह संस्कार, संस्कृती, परंपरा, चालीरीती व आदर असे अनेक पैलू त्यांच्याकडून पाडले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंचा नेहमी आदरपूर्वक सन्मान करावा.
काही विद्यार्थ्यांच्या मते शिक्षकांनी आपले ज्ञान केवळ पाठ्यपुस्तकांपुरतेच मर्यादित ठेवू नये. त्यांनी विद्यार्थ्यांना स्नेह व आपुलकी दिली पाहिजे. फक्त शिक्षक म्हणून सन्मान मिळत नाही, तर तो प्राप्त करावा लागतो, असे काहींचे मत आहे.