शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

घरफाळा प्रकरण : संजय भोसले यांच्यासह सहा अधिकाऱ्यांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2020 12:12 IST

muncipaltyCarporation, kolhapurnews घरफाळा लागू करण्याच्या कामात आर्थिक नुकसान केल्याच्या ठपका ठेवत गुरुवारी रात्री उशिरा महापालिकेतील करनिर्धारक, संग्राहक संजय भोसले, सिस्टिम मॅनेजर यशपाल रजपूत यांच्यासह सहा अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या. यामध्ये अधिकाऱ्यांना ३१ प्रकरणांमध्ये तर सिस्टीम मॅनेजर रजपूत यांना १८ प्रकरणांत दोषी ठरविण्यात आले आहे. उपायुक्त निखिल मोरे यांनी ही कारवाई केली असून आठ दिवसांत खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत.

ठळक मुद्देघरफाळा प्रकरण : संजय भोसले यांच्यासह सहा अधिकाऱ्यांना नोटीसआयुक्तांची धडक कारवाई : ३१ मिळकतींमध्ये आर्थिक नुकसान

कोल्हापूर : घरफाळा लागू करण्याच्या कामात आर्थिक नुकसान केल्याच्या ठपका ठेवत गुरुवारी रात्री उशिरा महापालिकेतील करनिर्धारक, संग्राहक संजय भोसले, सिस्टिम मॅनेजर यशपाल रजपूत यांच्यासह सहा अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या. यामध्ये अधिकाऱ्यांना ३१ प्रकरणांमध्ये तर सिस्टीम मॅनेजर रजपूत यांना १८ प्रकरणांत दोषी ठरविण्यात आले आहे. उपायुक्त निखिल मोरे यांनी ही कारवाई केली असून आठ दिवसांत खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत.महापालिकेमध्ये गेल्या काही दिवसांपासून घरफाळा घोटाळा चांगलाच गाजत आहे. ज्येष्ठ नगरसेवक भूपाल शेटे यांनी ३ कोटी १८ लाखांच्या घोटाळ्यामध्ये संबंधितांवर कारवाईसाठी महापालिकेवर उपोषणही केले. कृती समितीनेही श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली. चंद्रकांत रामाणे यांनी आत्मदहनाचा इशारा दिला. या सर्वाची दखल घेत आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी धडक कारवाई सुरू केली आहे.

उपायुक्त निखिल मोरे यांना चौकशी समितीमधील दोषींना नोटीस बजावण्याचे आदेश दिले. यानुसार घरफाळा विभागाचे करनिर्धारक, संग्राहक संजय भोसले यांना ९ प्रकरणांमध्ये नोटीस बजावली आहे तसेच प्रभारी अधीक्षक दीपक सोळंकी यांना ७ प्रकरण, करनिर्धारक व संग्राहक नंदन कांबळे यांना ११ प्रकरण, घरफाळा कनिष्ठ लिपीक बापू माने यांना ३ प्रकरण, घरफाळा विभाग अधीक्षक तानाजी मोरे यांना १ प्रकरण आणि सिस्टीम मॅनेजर यशपाल रजपूत यांना १८ प्रकरणांत नोटीस बजावली आहे.सिस्टीम मॅनेजरकडून गैरवर्तनघरफाळा घोटाळाप्रकरणी १४ सप्टेंबरला माहिती देण्यासाठी पत्र पाठविले होते. मात्र, आजपर्यंत यासंदर्भात माहिती दिली नाही. ही बाब गंभीर आहे. यामुळे गैरवर्तन, कार्यालयीन शिस्तभंग झाल्याचे दिसून येते. याप्रकरणी तीन दिवसांत खुलासा करण्याची नोटीस सिस्टीम मॅनेजर रजपूत यांना बजावली आहे.

तत्कालिन आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी ३ कोटी १८ लाख प्रकरणी संबंधितांवर कारवाईचे आदेश दिले होते; परंतु संंबंधितांनी कारवाई करण्यास चालढकलपणा केला. उपोषण केल्यानंतर आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दखल घेत ही कारवाई केली आहे. १८ प्रकरणांत कोट्यवधींचे नुकसान झाले असून दोषींवर निलंबन आणि फौजदारी कारवाई जोपर्यंत होत नाही. तोपर्यंत लढा कायम राहील.भूपाल शेटे, नगरसेवक, महापालिका

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर