कोल्हापूर : मार्च महिन्यापासून पवित्र रमजान महिन्यातील रोजे सुरू होणार आहेत. यासाठी कोल्हापूर हिलाल कमिटीने रोजाचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे. प्रत्येक मुस्लीम बांधव या वेळापत्रकानुसार आपल्या घड्याळात वेळ निश्चित करतात. चंद्रदर्शन झाल्यानंतर रमजानच्या रोजांना प्रारंभ होईल, अशी माहिती मुस्लीम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर यांनी दिली.रमजानच्या महिन्यात मुस्लीम धर्मियांत विशेष महत्त्व असते. यातही महिनाभराचे रोजे अधिक महत्त्वाचे मानले जातात. यानिमित्ताने रोजच्या इफ्तार पार्टी, अन्नदान, फितरा, जकातचे वाटप, रोज रात्री तराबीहीची सामुदायिक नमाज अशी दिवस-रात्र उपासना असते. सहरी व इफ्तारच्या तयारीसाठी फळे, सुका मेवा, खजूर यांच्यासह बेकरी पदार्थ, मिठाई खरेदी मुस्लीम बांधव करतात.
शब-ए-बरात निमित्त आज रोजाचा उपवासशब-ए-बरात निमित्त मुस्लिम बांधवांनी आज, शुक्रवारी रोजाचा उपवास केला. यानिमित्ताने गुरुवारी रात्री, कब्रस्तानात दिवंगत पूर्वजांच्या कबरीवर त्यांच्या प्रियजनांद्वारे मोक्ष प्राप्त व्हावा याकरिता प्रार्थना करण्यात आली. शब म्हणजे रात्र तर मोक्ष आणि क्षमा दर्शविणारा बारात हा अरबी शब्द आहे. शब-ए-बरात ही रात्र इस्लामिक दिनदर्शिकेनुसार शाबान महिन्याच्या १५ तारखेला साजरी केली जाते, जी भारतीय दिनदिर्शिकेनुसार गुरुवारी साजरी करण्यात आली. सहेरी आणि इफ्तारचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे-दिनांक - सहेरीची वेळ (पहाटे)- इफ्तारीची वेळ (सायंकाळी)२ मार्च : ५:२९ - ६:४३३ मार्च - ५:२८ - ६ :४३४ मार्च - ५:२८ - ६ : ४३५ मार्च - ५:२७ - ६ : ४४६ मार्च - ५:२६ - ६ : ४४७ मार्च - ५:२५ - ६ : ४४८ मार्च - ५:२५ - ६:४४९ मार्च - ५:२४ - ६ : ४४१० मार्च- ५:२४ - ६:४५११ मार्च- ५:२३ - ६ :४५१२ मार्च- ५:२२ - ६:४५१३ मार्च- ५:२१ - ६:४५१४ मार्च- ५:२१ - ६:४६१५ मार्च- ५:२० - ६:४६१६ मार्च- ५:१९- ६:४६१७ मार्च- ५:१८ -६:४६१८ मार्च- ५:१७ - ६:४६१९ मार्च- ५:१६ - ६:४८२० मार्च- ५:१६ - ६:४७२१ मार्च- ५:१५ - ६:४७२२ मार्च- ५:१४- ६:४७२३ मार्च- ५:१३ - ६:४७२४ मार्च- ५:१३ - ६:४८२५ मार्च- ५:१२ - ६:४८२६ मार्च- ५:११ - ६:४८२७ मार्च- ५:१० - ६ : ४८२८ मार्च - ५:०९ - ६:४८२९ मार्च- ५:०८ - ६ :४८३० मार्च- ५:०८- ६:४८३१ मार्च- ५:०७ -६ :४९