राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे पाकिस्तानच्या ध्वजाची होळी

By Admin | Updated: April 12, 2017 17:00 IST2017-04-12T17:00:12+5:302017-04-12T17:00:12+5:30

भारतीय नागरिकाला नाहक बळी देण्याचाच प्रयत्न

Holi of Pakistan flag by Nationalist Youth Congress | राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे पाकिस्तानच्या ध्वजाची होळी

राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे पाकिस्तानच्या ध्वजाची होळी

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. १२ : भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना कथितरित्या गुप्तहेर ठरवून पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली आहे. या निषेधार्थ मिरजक तिकटी येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे बुधवारी पाकिस्तानच्या ध्वजाची होळी करण्यात आली.

यावेळी युवक काँग्रेचे अध्यक्ष अमोल म्हणाले, पाकिस्तान लष्करी न्यायालयाने ही शिक्षा ठोठावताना जाधव यांना नैसर्गिक न्याय नाकारला आहे. त्यांना बचावाची कोणतीही संधी देण्यात आलेली नाही. भारतीय पाकिस्तानातील उच्चायुक्तांनाही जाधव यांना मदत करण्यापासून रोखण्यात आले. एकप्रकारे भारतीय नागरिकाला नाहक बळी देण्याचाच पाकिस्तानाचा प्रयत्न दिसून येत आहे.

यावेळी माजी महापौर आर. के. पोवार, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष राजेश लाटकर, माजी नगरसेवक आदिल फरास,उत्तर अध्यक्ष युवराज साळोखे, जिल्हा उपाध्यक्ष किशोर माने, समीर पाटील,कार्याध्यक्ष अनिल कदम, निरंजन कदम, जयदीप सरवदे, बबलू फाले, सुहास साळोखे, फिरोज सरगुर, सनिल देसाई, सचिन लोहार, एहसान शेख, आसिफ शेख, उमेश कोळापटे, प्रज्योत पाटील, सीताराम बोडेकर, विनोद जाधव, प्रमोद आयरेकर, मोहसिन पठाण, सुरज सुर्वे, साध मुजावर आदी उपस्थित होते.

Web Title: Holi of Pakistan flag by Nationalist Youth Congress