शाळांतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांबाबतच्या शासन आदेशाची होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:40 IST2020-12-15T04:40:23+5:302020-12-15T04:40:23+5:30
शाळांमधील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे पद हे कंत्राटी होणार असल्याने हा आदेश अन्यायकारक असल्याने तो रद्द करावा, या मागणीसाठी आंदोलन ...

शाळांतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांबाबतच्या शासन आदेशाची होळी
शाळांमधील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे पद हे कंत्राटी होणार असल्याने हा आदेश अन्यायकारक असल्याने तो रद्द करावा, या मागणीसाठी आंदोलन करण्यात येत असल्याचे शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस. डी. लाड यांनी सांगितले. या मागणीचे निवेदन शिक्षण उपसंचालक सत्यवान सोनवणे यांना दिले. शासनाने हा आदेश त्वरित मागे घेतला नाही,तर राज्यभर तीव्र आंदोलन करणाचा इशारा यावेळी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुरेश संकपाळ, शिक्षक नेते दादासाहेब लाड, बाबासाहेब पाटील यांनी दिला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील धरणे आंदोलनात जिल्ह्यातील सर्व शिक्षण संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विविध शैक्षणिक संघटनांचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत, अशी माहिती डी. एम. पाटील, शिवाजी माळकर यांनी दिली. यावेळी माजी शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे, पुंडलिक जाधव, खंडेराव जगदाळे, भरत रसाळे, सुधाकर निर्मळे, डी. एम. पाटील, गणपतराव बागडी, डी. एस. घुगरे, सी. एम. गायकवाड, उदय पाटील, के. के. पाटील, आदी उपस्थित होते.
चौकट
तीव्र आंदोलन
या अन्यायकारक शासन आदेशाची होळी करण्यापूर्वी मुख्याध्यापक संघाच्या विद्याभवन कार्यालयात सर्व संघटनांची सभा झाली. हा आदेश रद्द होईपर्यंत तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात असल्याचे लाड यांनी सांगितले.
फोटो (१४१२२०२०-कोल-आदेश होळी) : कोल्हापुरात सोमवारी शाळांतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या भरतीबाबतच्या आदेशाची होळी कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर शिक्षकेत्तर कर्मचारी, मुख्याध्यापक, शिक्षण संस्थाचालक संघ आणि जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या पदाधिकारी, सदस्यांनी केली.