कृषी विधेयक विरोधासाठी किसान सभेचे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:39 IST2020-12-15T04:39:04+5:302020-12-15T04:39:04+5:30
किसान संघर्ष समितीचे निमंत्रक, माजी आमदार संपतराव पवार म्हणाले, गेली अठरा दिवस पंजाब, हरियाणातील शेतकरी दिल्लीत ठाण मांडून बसले ...

कृषी विधेयक विरोधासाठी किसान सभेचे धरणे
किसान संघर्ष समितीचे निमंत्रक, माजी आमदार संपतराव पवार म्हणाले, गेली अठरा दिवस पंजाब, हरियाणातील शेतकरी दिल्लीत ठाण मांडून बसले आहेत. मात्र, केंद्रातील भाजप सरकारला जराही पाझर फुटत नाही. हे कायदे देशातील शेतकरी, शेती व ग्रामीण व्यवस्थेला मरणान्तक नुकसान पोहोचविणार आहेत. या कायद्यांच्या माध्यमातून केंद्र सरकार शेती उद्ध्वस्त करू पाहत आहे. त्यांचा डाव हाणून पाडण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळीच सावध होऊन प्रतिकार केला पाहिजे.
जनता दलाचे शिवाजीराव परुळेकर म्हणाले, जेव्हापासून केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या सरकार आले, तेव्हापासून कष्टकरी जनतेचे मोठे नुकसान झाले आहे. हे तीन कायद्यांची अंमलबजावणी सुरू झाली तर शेतकरी देशोधडीला लागतील. यावेळी नामदेवराव गावडे, चंद्रकांत यादव, उदय नारकर, अतुल दिघे, बाबासाहेब देवकर, सतीशचंद्र कांबळे, बाबूराव कदम, संभाजीराव जगदाळे, सम्राट मोटे, संदीप देसाई, व्यंकाप्पा भाेसले, रवी जाधव आदी उपस्थित होते.
आजपासून आठवडी बाजारात प्रबोधन
केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान कसे होणार आहे. त्याचे प्रबोधन आठवडी बाजारातून केले जाणार आहे. आज, मंगळवारी हसूर दुमाला (ता. करवीर) येथील आठवडी बाजारातून त्याची सुरुवात केली जाणार आहे.
फोटो ओळी : अखील भारतीय किसान संघर्ष समितीच्या वतीने केंद्रीय कृषी विधेयकाविरोधात सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. (फोटो-१४१२२०२०-कोल-किसान सभा)
- राजाराम लोंढे