प्रेक्षकांच्या ह्दयात मिळवले ‘हिय्या’ ने स्थान

By Admin | Updated: February 3, 2015 00:28 IST2015-02-03T00:16:37+5:302015-02-03T00:28:54+5:30

अंतिम दिवशी एकांकिका उत्कृष्ट : जयसिंगपूर राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा

Hiyayaa got the audience in the audience | प्रेक्षकांच्या ह्दयात मिळवले ‘हिय्या’ ने स्थान

प्रेक्षकांच्या ह्दयात मिळवले ‘हिय्या’ ने स्थान

जयसिंगपूर : आम्ही रसिक जयसिंगपूर आयोजित श्री दानचंद घोडावत चॅरिटेबल ट्रस्ट प्रायोजित राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धेच्या अंतिम दिवशी स्पर्धेची उंची वाढवणाऱ्या ठरला.प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या एकांकिकेत सरुवातीला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिचवड यांनी ‘कॉन्टास’ या एकांकिकेने स्पर्धेत रंगत आणली. प्रणव जोशी (शाम) व श्रृती कुलकर्णी (मीरा) यांचे अभियन उत्कृष्ठ झाले.रंगमुद्रा प्रतिष्ठान अहमदनगर यांची ‘ओपुनशिया’ ही एकांकिका सादरीकरणाच्या दृष्टीने उत्तम झाली. प्रशांत शेळके, अर्चना खरपुडे यांचे अभियन चांगले झाले. गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी यांनी नीलेश गोपनारायण दिग्दर्शित ‘हिय्या’ या एकांकिकेने रसिकांच्या मनात घर केले. रस्त्यावर पोल उभा करणाऱ्या मजुरांच्या जीवनावरील कथा. मनोज भिसे (मास्टर), मंथन खाडके (गण्या) यांचा अभियन उत्तम होता. स्वानंद देसाई यांची प्रकाश योजना सूचक होती.
त्यानंतर ‘एका लग्नाची पस्तीशी’ ही एकांकिका शब्द क्रिएशन मुंबईने उत्तम सादर केली. लग्न ही काळाची गरज आहे. जगण्याचे एक साधन आहे. एक पस्तिशीतला लग्न न झालेल्या तरूणाची ही कथा आहे. घर, आॅफिस व समाज यांच्याकडून तरूणास होणारा त्रास यात दाखविला आहे.के. टी. एच. एम. महाविद्यालय नाशिकने ‘वॉटस् अ‍ॅप’ ही एकांकिका आजच्या वॉटस् अ‍ॅपच्या प्रवाहात वाहत जाणाऱ्या तरूणांवर भाष्य करणारी ठरली. दहावीतील जुने मित्र वॉटस् अ‍ॅपवर भेटतात व मग त्यातून अश्लील मॅसेज, धर्मभावना दुखविणे, त्यामुळे होणाऱ्या दंगली आणि मग हे संगळे संपविण्यासाठी महाराजांचे पुन्हा येणे, असा ज्वलंत विषय मांडला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Hiyayaa got the audience in the audience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.