हिंदकेसरी खंचनाळे निधन ...पालकमंत्री प्रतिक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:40 IST2020-12-15T04:40:57+5:302020-12-15T04:40:57+5:30
- अजित पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य भारताचे पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांच्या निधनामुळे देशातील कुस्ती क्षेत्रातील दिग्गज हरपला. कोल्हापूरच्या ...

हिंदकेसरी खंचनाळे निधन ...पालकमंत्री प्रतिक्रिया
- अजित पवार
उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
भारताचे पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांच्या निधनामुळे देशातील कुस्ती क्षेत्रातील दिग्गज हरपला. कोल्हापूरच्या कुस्तीपंढरीचा नावलौकिक देशभरात कायम राहावा, याकरिता झटणारा खराखुरा मल्ल हरपला. ही पोकळी कधीही न भरून येणारी आहे.
सतेज पाटील,
पालकमंत्री
कोल्हापूरच्या कुस्तीचा वसा आणि वारसा जपणारे पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अशा दिग्गजांमुळेच परदेशातील मल्लांनाही कुस्तीपंढरी शाहू नगरीत येण्याचा मोह आवरता आला नाही.
- ऋतुराज पाटील, आमदार
चौकट
पालकमंत्र्यांचा आधार
देशाचे पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांच्यावर गेले महिनाभर मल्टीपल डिसीजमुळे महावीर काॅलेजनजीकच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांचा सर्व खर्च पालकमंत्री सतेज पाटील यांनी उचलला. त्यांच्याच प्रयत्नामुळे राज्याच्या क्रीडा विकास निधीतून उपचारासाठी पाच लाखांची मदत व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी एक लाख व अन्य दानशूरांकडून ५० हजार अशी साडेसहा लाखांची मदत खंचनाळे कुटुंबीयांना झाली.