हिमांशू शर्मा विजेता
By Admin | Updated: November 29, 2014 00:28 IST2014-11-29T00:27:19+5:302014-11-29T00:28:05+5:30
राष्ट्रीय बुद्धिबळ : डी. बालचंद्र प्रसाद उपविजेता

हिमांशू शर्मा विजेता
निपाणी : निपाणीतील उत्कर्ष फौंडेशनतर्फे रतनबाई शाह स्मृती आंतरराष्ट्रीय फिडे मानांकन खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत शेवटच्या फेरीत रेल्वेच्या हिमांशू शर्माने पुण्याच्या अनिरुद्ध देशपांडेला बरोबरीत रोखून ८.५ गुणांसह विजेतेपद पटकाावले. त्याला रोख २१ हजार रुपये आणि चषक देऊन गौरविण्यात आले.
आंध्रप्रदेशचा डी. बालचंद्र प्रसाद आणि आंध्र बॅँकेचा जे. रामकृष्ण यांच्यातील खेळसुद्धा बरोबरीत झाला. यावेळी डी. बालचंद्रने आठ गुणांसह उपविजेतेपद पटकावले. त्याला रोख १५ हजार रुपये आणि चषक देऊन गौरविण्यात आले. चिंतामणी जोशी, डी. गणेश, सुनील वैद्य यांचा १७०० तर युवान रॉड्रीग्ज, अविनाश प्रभुदेसाई, कौशल्य खेडेकरना १४०० रेटिंग खालील स्पर्धक म्हणून घोषित केले.
६० वर्षांवरील उत्कृष्ट खेळाडू म्हणून सुरेश जोशी, विलास भावे, एल. पी. खाडीलकर, उत्कृष्ट महिला खेळाडू म्हणून समिक्षा पाटील, ऐश्वर्या थोरात, तन्वी हडकोनकर यांना सन्मानित करण्यात आले. ११ वर्षांखालील उत्कृष्ट खेळाडू म्हणून प्रणव आनंद, आदित्य सावळकर, स्वरा ब्रागांझा, १३ वर्षांखालील उत्कृष्ट खेळाडू म्हणून संजय थोरात, श्रेयस कुलकर्णी, बी. एस. नाईक आणि १५ वर्षांखालील उत्कृष्ट खेळाडू म्हणून तत्वेश सावंत, राजा ऋत्विक व एस. व्ही. नवनीत यांना गौरविण्यात आले.
उत्कृष्ट बिगर नामांकित खेळाडू म्हणून प्रकाश कुलकर्णी, राघवेंद्र बेळगुडकर, राजन देशपांडे, सम्मेद मगदूम, दर्शन मगदूम, राहुल कांबळे, भारत पाटोळे याना सन्मानित करण्यात आले. यावेळी चंद्रकांत कोठीवाले, माजी आम. प्रा. सुभाष जोशी, बाबासाहेब सासणे, प्रवीणभाई शाह, डॉ. महेश कोरे, डॉ. अरुण पाटील उपस्थित होते. (प्रतिनिधी)