शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शक्तिपीठ विरोधात १२ जिल्ह्यांत महामार्ग रोखणार, १ जुलैला कृषीदिनी आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 13:27 IST

आज ठिकाण निश्चित होणार..

कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्ग विरोधाची धार तीव्र करण्यासाठी १ जुलैला कृषिदिनीच राज्यातील १२ जिल्ह्यात महामार्ग रोको आंदोलन करण्याचा निर्णय गुरुवारी (दि. २६) ऑनलाइन बैठकीत झाला. शक्तिपीठ महामार्गविरोधी संघर्ष समितीने बैठकीचे आयोजन केले होते. काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील, सांगलीचे खासदार विशाल पाटील, आमदार विश्वजित कदम, धारशिवचे आमदार कैलास पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह १२ जिल्ह्याचे समितीचे समन्वयक सहभागी झाले.आमदार पाटील म्हणाले, शक्तिपीठासाठीची मोजणी हाणून पाडायची आहे. यासाठीची टप्प्याटप्प्याने आंदोलनाची तीव्रता वाढवली जाईल. बारा जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे नेते आंदोलनात सहभागी होण्यासाठी मी प्रयत्न करतो. यापुढील काळात शक्तिपीठविरोधात रस्त्यावरची लढाई व्यापक करू. पावसाळी अधिवेशनातही विरोधाची भूमिका ताकदीने मांडू.खासदार विशाल पाटील म्हणाले, सांगली जिल्ह्यात मोठ्या ताकदीने १ जुलैला महामार्ग रोकोचे आंदोलन केले जाईल. बारा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी आपल्या परिसरात महामार्ग रोखण्याची तयारी करावी.माजी खासदार शेट्टी म्हणाले, शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात आता थेट मैदानात उतरूया. मी सुरुवात केली आहे. १ जुलैच्या आंदोलनात मोठ्या संख्येेने शेतकरी सहभागी होण्यासाठी जागृत करू. सिंधुदुर्ग ते वर्धापर्यंतच्या बाधित गावात बैठका घेऊन आंदोलन यशस्वी करावे.आमदार कदम म्हणाले, सांगली जिल्ह्यातील बाधीत गावांत बैठक घेऊन शेतकऱ्यांमध्ये जागृती केली जाईल. बैठकीस उद्धवसेनेचे विजय देवणे, नांदेडचे सतीश कुलकर्णी, परभणीचे गोविंद घाटोळे, बीडचे अजय बुरांडे, सांगलीचे महेश खराडे यांच्यासह बारा जिल्ह्यातील समन्वयक सहभागी झाले होते.

खासदार प्रणिता शिंदे यांना सहभाग घेण्यास सांगा..सोलापूर जिल्ह्यातून १५६ किलोमीटर लांबीचा महामार्ग होणार आहे. याला शेतकरी तीव्र विरोध करीत आहेत. मात्र बाधित शेतकऱ्यांना राजकीय पाठबळ मिळत नाही. म्हणून खासदार प्रणिता शिंदे यांना आंदोलनाच्या पाठीशी राहण्यास सांगावे, अशी मागणी समन्वयक डॉ. सुनील दळवे यांनी केली.आज ठिकाण निश्चित होणार..कोल्हापूर जिल्ह्यात रास्ता रोको करण्याचे ठिकाण आज, शुक्रवारी निश्चित होणार आहे. आमदार पाटील शासकीय विश्रामगृहात प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन ठिकाण निवडणार आहेत.