शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य अधिकाऱ्यांच्या जागा जास्त, अर्जच कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 11:42 IST

महाराष्ट्र शासनाच्यावतीने नेमण्यात येणाऱ्या ‘कम्युनिटी हेल्थ आॅफिसर’ या पदासाठी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये जेवढ्या जागा आहेत त्यापेक्षा निम्मेही अर्ज न आल्याचे चित्र समोर आले आहे. उलट कोल्हापूरला मात्र याच पदासाठी तिप्पट अर्ज दाखल झाले आहेत.

ठळक मुद्देआरोग्य अधिकाऱ्यांच्या जागा जास्त, अर्जच कमीसिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांतील चित्र

समीर देशपांडेकोल्हापूर : महाराष्ट्र शासनाच्यावतीने नेमण्यात येणाऱ्या ‘कम्युनिटी हेल्थ आॅफिसर’ या पदासाठी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये जेवढ्या जागा आहेत त्यापेक्षा निम्मेही अर्ज न आल्याचे चित्र समोर आले आहे. उलट कोल्हापूरला मात्र याच पदासाठी तिप्पट अर्ज दाखल झाले आहेत.सर्वच आरोग्य उपकेंद्रांना अशा पद्धतीचे कंत्राटी आरोग्य अधिकारी देण्याचा निर्णय शासनाच्यावतीने घेण्यात आला होता. त्यानुसार काही जिल्ह्यांमध्ये ही भरतीप्रक्रिया पारही पडली. मात्र, महापूर, लोकसभा आणि विधानसभा निवडणूक यामुळे कोल्हापूर मंडळातील सांगली वगळता कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांची भरती प्रक्रिया झाली नव्हती.ही प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, जाहिरातीद्वारे अर्ज मागविण्यात आले होते. कोल्हापूरच्या ३८० जागांसाठी तिप्पट म्हणजे ९०३ अर्ज आले आहेत, तर सिंधुदुर्गसाठी २७० जागा असताना तेथे फक्त ८० डॉक्टरनी अर्ज केले आहेत. रत्नागिरीसाठी ३५० जागा असताना तेथेही फक्त १७४ अर्ज दाखल करण्यात आले आहेत.या अर्जांची सध्या कोल्हापूरच्या आरोग्य उपसंचालक कार्यालयामध्ये छाननी सुरू असून, त्यानंतर यातील पात्र उमेदवारांची यादी लावून याबाबत हरकती मागविण्यात येतील. त्यातून पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाईल.

त्यात उत्तीर्ण झालेल्यांना सहा ते आठ महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यानंतर नाशिक आरोग्य विद्यापीठाच्यावतीने प्रशिक्षणानंतर एक परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यातून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची या पदांवर नियुक्ती केली जाणार आहे.निकष आणि मानधनबीएएमएस किंवा बीएस्सी. (नर्सिंग) झालेले उमेदवार यासाठी पात्र असून, त्यांना दरमहा २५ हजार रुपये ठोक मानधन देण्यात येणार आहे. याशिवाय त्यांचे महिन्यातील काम पाहून कामगिरीवर आधारित १५ हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे.कोल्हापूरमधील पात्र उमेदवारांना कोकणात संधीसिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील आरोग्य अधिकारी पदाच्या जेवढ्या जागा आहेत त्यापेक्षा निम्मेही अर्ज आलेले नाहीत. उलट कोल्हापूर जिल्ह्यात तिप्पट अर्ज आले आहेत. त्यामुळे जर कोल्हापूरचे उमेदवार असलेल्या जागांपेक्षा अधिक संख्येने पात्र झाले तर त्यांना रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत सेवा करता येईल, असे सूत्रांनी सांगितले.जिल्हा उपलब्ध जागा आलेले अर्ज

  • कोल्हापूर ३८० ९०३
  • सिंधुदुर्ग २७० ८०
  • रत्नागिरी ३५० १७४

कामाचे स्वरूपप्रत्येक उपकेंद्रावर या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दुपारपर्यंत थांबणे बंधनकारक असून, त्यांनी येणाऱ्या रुग्णांची देखभाल करावयाची आहे. दुपारनंतर त्यांनी सर्व लसीकरण कार्यक्रम, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान आणि अन्य शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी काम करणे अपेक्षित आहे. 

 

टॅग्स :Healthआरोग्यRatnagiriरत्नागिरीsindhudurgसिंधुदुर्गkolhapurकोल्हापूर