शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: 'बिद्री'वर प्रशासक नेमणुकीची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली, आमदार आबीटकर गटाला धक्का 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2023 13:53 IST

दत्ता लोकरे  बिद्री: बिद्री साखर कारखान्यावर असलेल्या संचालक मंडळाची मुदत संपल्याने प्रशासक नेमणूक करावी अशी मागणी आमदार प्रकाश आबीटकर ...

दत्ता लोकरे बिद्री: बिद्री साखर कारखान्यावर असलेल्या संचालक मंडळाची मुदत संपल्याने प्रशासक नेमणूक करावी अशी मागणी आमदार प्रकाश आबीटकर गटाचे महिपती श्रीपती उगले व अन्य दहा जणांनी मुंबई उच्च न्यायालयात केली होती. मात्र, उच्च न्यायालयाने ही मागणी फेटाळली. त्यामुळे आबीटकर गटाचे प्रशासक नेमणुकीचे मनसुबे उधळले.कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत संपल्याने प्रशासक नेमणूक करण्यात यावी अशी याचिका 10 मार्च 2023 रोजी महिपती उगले व अन्य 10 जणांनी केली होती. तर कारखाना प्रशासनाने निवडणूक घ्यावी यासाठी निवडणूक प्राधिकरणास कळवले होते. त्यानंतर सप्टेंबर 2022 मध्येही कारखान्याची निवडणूक वेळेत घ्यावी अशा आशयाची लेखी मागणी केली होती. त्यानुसार निवडणूक प्राधिकरणाने 10 ऑक्टोबर 2022 रोजी कारखान्यास पत्र पाठवून जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी याबाबत नियमानुसार यथावकाश निवडणूक प्रक्रिया पूर्ण करेल असे कळवले होते. तरीही याबाबत काय निर्णय होईल याबाबत साशंकता होती. एकीकडे निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असतानाच ही निवडणूक पावसाळ्यात येत असल्याने ती पुढे ढकलावी अशी मागणी आमदार आबीटकर यांनी केली होती. त्या अनुषंगानेच राज्यातील सर्व निवडणूक कार्यक्रम 30 ऑक्टोबर पर्यंत पुढे ढकलण्यात आला होता. आता निवडणूक रणधुमाळी सुरू होत असतानाच आरोप-प्रत्यारोपाच्या फेरी झडत होत्या. मात्र आजच आबीटकर गटाने केलेल्या मागणीबाबत उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी प्रशासक नेमणुकीची मागणी मुंबई उच्च न्यायालयाने न्यायमूर्ती नितीन जामदार व मंजुश्री देशपांडे यांनी फेटाळली. दाव्याची सुनावणी पुढे सुरु राहणार आहे. कारखान्याच्यावतीने अँड. विजयसिंह थोरात व सोहेल शहा यांनी काम पाहिले. तर विरोधी गटाच्यावतीने अँड. सतीश तळेकर आणि प्रशांत भावके यांनी काम पाहिले.

खोटे नाटे आरोप करून सतेच्या जोरावर आमदार प्रकाश आबीटकर हे चांगल्या संस्थेची नाहक बदनामी करत आहेत. त्यांनी आणखीन दोन वर्षे प्रशासक नेमण्याचा कुटील डाव आखला होता. न्यायालयाच्या या निर्णयाने त्यांचे मनसुबे उधळले आहेत. आता सभासद सुध्दा त्यांना जागा दाखवतील - के. पी. पाटील, अध्यक्ष 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेPrakash abitkarप्रकाश आबिटकरK P. Patilके. पी. पाटील