शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

Maharashtra Vidhan Sabha 2019 : विनय कोरेंचा थेट घरी जाऊन अरुण नरके यांना प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 14:10 IST

जनसुराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, माजी मंत्री विनय कोरे यांनी शुक्रवारी दुपारी त्यांचे कट्टर राजकीय विरोधक व ‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांची भेट घेतली. ‘पन्हाळा-शाहूवाडीत’ आपणास मदत करा, ‘करवीर’मध्ये तुमचे पुतणे शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांना ताकद देतो, असा प्रस्ताव त्यांनी ठेवल्याचे विश्वसनीय सूत्राकडून समजते.

ठळक मुद्दे‘शाहूवाडीत’ मदत करा, ‘करवीर’मध्ये ताकद देतोविनय कोरेंचा थेट घरी जाऊन अरुण नरके यांना प्रस्ताव

कोल्हापूर : जनसुराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, माजी मंत्री विनय कोरे यांनी शुक्रवारी दुपारी त्यांचे कट्टर राजकीय विरोधक व ‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांची भेट घेतली. ‘पन्हाळा-शाहूवाडीत’ आपणास मदत करा, ‘करवीर’मध्ये तुमचे पुतणे शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांना ताकद देतो, असा प्रस्ताव त्यांनी ठेवल्याचे विश्वसनीय सूत्राकडून समजते.पन्हाळा तालुक्याच्या राजकारणात दिवंगत माजी आमदार यशवंत एकनाथ पाटील व विनय कोरे यांचा कायमच संघर्ष राहिला. २५ वर्षे यशवंत पाटील यांनी ‘पन्हाळा-गगनबावडा’ मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले. पाटील व अरुण नरके हे मामाभाचे असल्याने दोघांनीही एकमेकांसोबतच राजकारण केले.

विधानसभाच नव्हे तर ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषदेपर्यंत व जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीत कोरे-पाटील गट आमनेसामने आजही येतात. अनेक वेळा दोन्ही गटांत मोठा संघर्ष उफाळून आला; त्यामुळेच पन्हाळ्यातील प्रत्येक गावात दोन्ही गट ताकदीने उभे आहेत.

मागील विधानसभेच्या निवडणुकीत पाटील यांचे सुपुत्र व जिल्हा बॅँकेचे माजी संचालक अमरसिंह पाटील हे ‘स्वाभिमानी’तून रिंगणात होते. पाटील यांच्याबरोबरच राष्ट्रवादीचे बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर हे रिंगणात उतरल्याने पन्हाळ्यातील मतांमध्ये विभाजन होऊन कोरे यांचा अवघ्या ३00 मतांनी पराभव झाल्याचे ‘जनसुराज्य’च्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे; त्यामुळेच यावेळेला पन्हाळ्यातील पडझड रोखत विरोधकांना सोबत घेण्याची तयारी कोरे यांनी केली आहे.

अमरसिंह पाटील यांच्याशी जुळवून घेतल्यानंतर आता नरके गटाला सोबत घेऊन सत्यजित पाटील यांचा वारू रोखण्याची खेळी ते खेळत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर विनय कोरे यांनी शुक्रवारी दुपारी दोन वाजता अरुण नरके यांच्या शिवाजी पेठेतील निवासस्थानी अचानक भेट दिली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे पाऊण तास चर्चा झाली. ‘शाहूवाडीत’ आम्हाला मदत करा, चंद्रदीप नरके यांना करवीरमध्ये मदत करण्याचा प्रस्ताव कोरे यांनी नरके यांच्यासमोर ठेवला.कोरे पहिल्यांदाच नरके यांच्या घरीपन्हाळा तालुक्यात कोरे-नरके यांचा राजकीय सत्तासंघर्ष संपूर्ण जिल्ह्याला माहिती आहे; त्यामुळे २५-३० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत विनय कोरे हे थेट नरके यांच्या घरी पहिल्यांदाच गेल्याने पन्हाळा-शाहूवाडीत एकच खळबळ उडाली आहे.‘हातकणंगले’त आवळेंसह दोन डॉक्टर इच्छुकहातकणंगले मतदारसंघातून ‘जनसुराज्य’ पक्षाकडून माजी आमदार राजीव आवळे यांच्यासह डॉ. विश्वनाथ सावर्डेकर व डॉ. मिलिंद हिरवे हे इच्छुक आहेत. जिल्हा परिषदेचे सदस्य अशोकराव माने हे येथून प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे; पण त्यांनी अद्याप संपर्क साधला नसल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले.

विनय कोरे माझ्याकडे आले होते. निवडणुका असल्याने सर्वजण भेटत असतात, त्याचप्रमाणे ते भेटले. त्या पलिकडे काहीच चर्चा झाली नाही.- अरुण नरके, ज्येष्ठ संचालक, ‘गोकुळ’

 

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाVinay Koreविनय कोरेshahuwadi-acशहावाडीkolhapurकोल्हापूर