शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भाजपाला धक्का, अधिकृत उमेदवाराने अर्ज घेतला मागे; माघारीनंतर पूजा मोरेंना अश्रू अनावर
2
ठरले! स्लीपर वंदे भारत ‘या’ तारखेपासून प्रवासी सेवेत, तिकीट दरही आले; PM मोदी करणार लोकार्पण
3
आयटी रिटर्नची मुदत संपली तरी आशा कायम! 'या' मार्गाने मिळवू शकता रखडलेला टॅक्स रिफंड
4
शौचालयाच्या खाली असलेल्या पाण्याच्या मुख्य पाईपलाईनमध्ये गळती, दूषित पाण्यामुळे ७ जणांचा मृत्यू, १४९ जण गंभीर; अधिकारी निलंबित
5
बाथरुममध्ये गेली अन् जीव गमावून बसली; वाढदिवसाच्या आदल्या दिवशी तरुणीसोबत काय घडलं?
6
खामेनेईंची सत्ता धोक्यात! इराणमध्ये लोक रस्त्यावर का उतरले? जाणून घ्या कारण...
7
नील सोमय्यांविरोधात दोन्ही ठाकरे, काँग्रेसने उमेदवारच दिला नाही?, किरीट सोमय्यांनी मानले देवाचे आभार
8
Team India ODI Schedule 2026: रोहित-विराटची क्रेझ! नव्या वर्षात टीम इंडिया किती वनडे खेळणार?
9
वॉरेन बफेंची 'एनर्जी मशीन' आज पासून अ‍ॅक्शन मोडमध्ये, कोण आहेत ग्रेग एबेल, ज्यांच्या हाती आलीये बर्कशायर हॅथवेची धुरा
10
चमत्कार! ११ वर्षांच्या मुलावरून गेले मालगाडीचे ४० डबे, साधं खरचटलंही नाही
11
जळगावमध्ये ठाकरेंच्या उमेदवाराची माघार अन् शिंदेसेनेचं खातं उघडलं! आमदार पुत्र गौरव सोनवणे बिनविरोध
12
भारतीय अर्थव्यवस्थेची भरारी! बँकांचा पाया भक्कम, एनपीए घटला; RBI च्या अहवालात नेमकं काय म्हटलंय?
13
वडील आणि भावाला गमावलं, दु:खाचा डोंगर कोसळला, पण खचला नाही, आता कमबॅकसाठी सज्ज झालाय हा भारतीय गोलंदाज
14
Malegaon Election 2026: 'इस्लाम' पार्टीने खाते उघडले; मुनिरा शेख बिनविरोध निश्चित, अपक्ष उमेदवाराने घेतली माघार
15
Ai व्हिडिओद्वारे 'या' भारतीय युट्यूब चॅनेलने एका वर्षात केली तब्बल 38 कोटी रुपयांची कमाई
16
Malegaon Municipal Corporation Election : मालेगाव मनपा उमेदवारी छाननीत १५ अर्ज ठरले बाद; अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम
17
अखेर मुंबईत ‘या’ ठिकाणी ठाकरे बंधू आमने-सामने; मनसे-उद्धवसेनेने अर्ज भरले, कोण माघार घेणार?
18
Vastu Tips: २०२६ मध्ये नशीब सोन्यासारखं चमकेल, फक्त कॅलेंडरच्या प्रत्येक पानावर करा 'हा' छोटा बदल!
19
हातात बिअरची बाटली घेऊन गोव्यातील रस्त्यावर फिरताना दिसली सारा तेंडुलकर, फोटो झाला व्हायरल   
20
रेखा झुनझुनवाला यांच्याकडे 'या' कंपनीचे आहेत १७ लाखांपेक्षा अधिक शेअर्स; मोठी अपडेट, आता शेअरमध्ये हेवी बाईंग
Daily Top 2Weekly Top 5

Good news: कोल्हापुरात सर्व पोलिसांना हेल्मेट, अधिकाऱ्यांना अँड्रॉइड मोबाइल मिळणार; पोलिस अधिक्षकांची नववर्ष भेट

By उद्धव गोडसे | Updated: January 1, 2026 12:44 IST

कामकाज होणार गतिमान

उद्धव गोडसेकोल्हापूर : नवीन वर्षात पोलिसांसाठी गुड न्यूज आहे. जिल्हा पोलिस दलातील ३३०० पोलिसांना मुख्यालयाकडून हेल्मेट दिले जाणार आहे. तसेच सर्व वरिष्ठ अधिकारी, पोलिस ठाणी आणि शाखांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना प्रशासकीय कामांसाठी अँड्रॉइड मोबाइल दिले जाणार आहेत. यामुळे कामकाज गतिमान होईल, असा विश्वास पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी व्यक्त केला आहे.कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी नेहमी रस्त्यांवर असलेल्या पोलिसांच्या सुरक्षेला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्राधान्य दिले आहे. अनेक पोलिस दुचाकीवरून प्रवास करताना हेल्मेट वापरत नाहीत. वरिष्ठांनी सूचना दिल्यानंतर काही दिवस याची अंमलबजावणी होते. त्यानंतर हळूहळू पुन्हा हेल्मेट घरात धूळखात पडतात. कायद्याच्या रक्षकांनी नियमित हेल्मेटचा वापर केल्यास इतर दुचाकीस्वारांना सांगणे सोयीचे ठरते. त्यामुळे आधी पोलिसांनाच हेल्मेट देण्याचा निर्णय पोलिस अधीक्षकांनी घेतला आहे. त्यानुसार जिल्हा पोलिस दलातील सर्व ३३०० पोलिसांना नवीन वर्षाच्या सुरुवातीला हेल्मेट प्रदान केली जाणार आहेत. हेल्मेट मिळताच पोलिसांना त्याचा नियमित वापर करावा लागणार आहे.दुसरा उपक्रम प्रभारी अधिकाऱ्यांसाठी राबवला जाणार आहे. पोलिसांचे दैनंदिन कामकाज गतिमान आणि विनाव्यत्यय होण्यासाठी पोलिस अधीक्षकांपासून ते सर्व पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना मोबाइल दिले जाणार आहेत. त्याचे सिमकार्ड आणि वार्षिक रिचार्ज मुख्यालयाकडून मिळणार आहे. अधिकारी बदलताच तो मोबाइल नवीन अधिकाऱ्यांकडे सुपूर्द होईल. यामुळे आवश्यक मोबाइल नंबर आणि माहिती नवीन अधिकाऱ्यांना उपलब्ध होणार आहेत. यावरच प्रशासकीय कामांचे व्हॉट्सॲप ग्रुप असतील. वरिष्ठांचे फोन, मेसेज याच नंबरवर येतील. त्यामुळे कामकाज गतिमान आणि विनाखंडित होत राहील, असे पोलिस अधीक्षकांनी सांगितले.

स्वत:पासून सुरुवातहेल्मेटचा वापर करा, असे वारंवार सांगूनही दुचाकीस्वार हेल्मेटचा वापर करीत नाहीत. कायद्याचे रक्षण करणारे पोलिसच हेल्मेट वापरत नसल्याचे नागरिकांकडून बोलले जात होते. त्यावर उपाय म्हणून पोलिसांनी स्वत:पासून सकारात्मक बदलाला सुरुवात केली आहे. पोलिसांनी हेल्मेटचा वापर सुरू केल्यानंतर नागरिकांनाही हेल्मेट वापरण्याचे आवाहन केले जाणार आहे.

८० मोबाइलची खरेदीपोलिस अधीक्षक, दोन्ही अपर पोलिस अधीक्षक, सर्व उपअधीक्षक, सर्व पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, पासपोर्ट, जिल्हा विशेष शाखा, आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा यासह इतर शाखांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना मोबाइल दिले जाणार आहेत. यासाठी ८० मोबाइलची खरेदी केली असून, फॅन्सी सिरियल नंबर घेतले जात आहेत असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Police Get Helmets, Android Mobiles as New Year Gift

Web Summary : Kolhapur police receive helmets and Android phones for enhanced efficiency and safety. All 3300 police personnel will get helmets, while officers receive mobiles with pre-paid SIMs for seamless communication.