कोल्हापूर: शहरात आज, मंगळवारी दुपारच्या सुमारास जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानकच पावसाच्या जोरदार सरी कोसळून लागल्याने नागरिकांची धावपळ उडाली. दिवाळी सणामुळे बाजारपेठेतील व्यापाऱ्याची माल सुरक्षित ठेवण्यासाठी मोठी तारांबळ उडाली.हवामान खात्याने पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, गेल्या काही दिवसापासून पावसाने उघडीप दिल्याने अन् कडकडीत ऊन असल्याने नागरिक छत्री, रेनकोट विना बाहेर पडले होते. आज, लक्ष्मीपूजन असल्याने बाजारपेठेत खरेदीसाठी मोठी गर्दी होती. अशातच आज दुपारी भर उन्हातच पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. काही मिनिटातच रस्त्यावर पाणी पाणी झाले होते. पावसाने उघडीप घेताच पुन्हा रस्त्यावर वर्दळ सुरु झाली.
{{{{facebook_video_id####https://www.facebook.com/reel/1201993668523688/}}}}
Web Summary : Kolhapur experienced sudden heavy rain, disrupting Diwali shopping. Vendors rushed to protect their goods as the downpour caught everyone unprepared amidst sunny weather. Roads quickly flooded.
Web Summary : कोल्हापुर में अचानक भारी बारिश से दिवाली की खरीदारी बाधित हुई। धूप के मौसम में अप्रत्याशित वर्षा से विक्रेता सामान बचाने के लिए भागे। सड़कें तुरंत जलमग्न हो गईं।