शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

मराठा मूकआंदोलन पार्श्वभूृमीवर अवजड वाहतुकीला शहरात प्रवेश बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:33 IST

कोल्हापूर : सकल मराठा समाजास आरक्षण मिळावे यासाठी खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधीस्थळी आज बुधवारी ...

कोल्हापूर : सकल मराठा समाजास आरक्षण मिळावे यासाठी खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधीस्थळी आज बुधवारी मूकआंदोलन होत आहे. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरात आंदोलनाच्या ठिकाणी गर्दी होऊ नये तसेच वाहनधारकांना त्रास होऊ नये यासाठी शहरात जड अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. तसेच शहरातील काही मार्गावर तात्पुरता प्रवेश बंद तर पर्यायी मार्ग देण्यात आले आहेत.

जड-अवजड वाहनांसाठी...

- रत्नागिरी मार्गावरून शहरात येणा-या सर्व अवजड वाहनांना वडणगे फाटा येथे प्रवेश बंद केला आहे. तेथून अवजड वाहनांना वडणगे, निगवे, शियेमार्गे राष्ट्रीय महामार्गाकडे मार्गस्थ व्हावे.

- गगनबावडा कडून येणा-या वाहनांना फुलेवाडी जकात नाका येथे आडवून रिंगरोडमार्गे पुढे मार्गस्थ केले.

- राष्ट्रीय महामार्गावरून तावडे हॉटेलमार्गे रत्नागिरीला जाणा-या वाहनांना शहरात ताराराणी चौकात प्रवेश बंद ठेवून धैर्यप्रसाद चौक, सर्किट हाऊस, कसबा बावडा, शिये, भुये, निगवे मार्गे मार्गस्थ.

कसबा बावडाकडून शहरात येणारे व पुढे राधानगरी, गगनबावडाकडे जाणारे वाहने डीएसपी ऑफिस चौकातून पितळी गणपती, धैर्यप्रसाद मार्गे ताराराणी चौक, रिंगरोडमार्गे पुढे मार्गस्थ.

- राधानगरीकडून वाहनांना क्रशर चौक, प्रवेश बंद असून त्यांना संभाजीनगर मार्गे मार्गस्थ व्हावे.

याशिवाय दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधीस्थळाकडे येणारे सर्व मार्ग बंद करून ती वाहतूक इतर मार्गावरून वळवली आहे. ही वाहने दसरा चौक, सोन्या मारुती मंदिरानजीक, सीपीआर येथे बंद करून पर्यायी मार्गाने वळवली आहेत.

पार्किंग व्यवस्था...

ब्रम्हपुरी चर्चचे मैदान, पंचगंगा नदी घाट परिसर, एस्तर पॅटर्न हायस्कूल मैदान, लक्ष्मी क्लब मैदान (दसरा चौक), चित्रदुर्ग मठ, सासने मैदान, व्हिनस कॉर्नर येथे गाडी अड्डा, आर्यर्विन ख्रिश्चन मैदान, खराडे महाविद्यालय, प्रायव्हेट हायस्कूल मैदान येथे पार्किंग व्यवस्था केली आहे.