शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
6
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
7
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
8
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
9
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
10
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
11
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
12
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
13
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
14
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
15
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
16
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
17
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
18
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
19
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
20
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची उघडझाप, अद्याप ३५ बंधारे पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 6:11 PM

कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी पावसाची उघडझाप राहिली. दिवसभरात अधूनमधून सरी कोसळत राहिल्या. सोमवार (दि. १०)च्या तुलनेत पाऊस कमी असल्याने नद्यांची पातळी घसरू लागली आहे. राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे अद्याप खुले असून त्यातून प्रतिसेकंद ४२५६ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यात पावसाची उघडझापअद्याप ३५ बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी पावसाची उघडझाप राहिली. दिवसभरात अधूनमधून सरी कोसळत राहिल्या. सोमवार (दि. १०)च्या तुलनेत पाऊस कमी असल्याने नद्यांची पातळी घसरू लागली आहे. राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे अद्याप खुले असून त्यातून प्रतिसेकंद ४२५६ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे.जिल्ह्यात मंगळवारी सकाळपासून पावसाची भुरभुर राहिली असली तरी त्यात जोर नव्हता. गगनबावडा, शाहूवाडी, पन्हाळा, राधानगरी तालुक्यांत मात्र चांगला पाऊस झाला. धरणक्षेत्रातही पाऊस राहिल्याने राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे खुले आहेत.

वारणा धरणातूनही प्रतिसेकंद ४२७२ व दूधगंगेतून १८०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगेची पातळी ३८.२ फुटांवर असून अद्याप ३५ बंधारे पाण्याखाली आहेत. चार राज्य, तर १० प्रमुख जिल्हा मार्ग अद्याप बंद असल्याने वाहतूक विस्कळीत आहे. 

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर