शहरं
Join us  
Trending Stories
1
'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून कसलीही चर्चा झाली नाही'; भारताने दावा फेटाळला, अमेरिकेच्या अध्यक्षांची 'पंचाईत'
2
'स्वतःच्या अपयशांसाठी शेजाऱ्यांना दोष देणे पाकिस्तानची जुनी सवय', अफगाण-पाक संघर्षावरुन भारताचे टीकास्त्र
3
कर्मचारीच द्यायचा टिप, मग फ्लिपकार्टच्या ट्रकमधील वस्तूंवर मारायचे डल्ला, ७ जण अटकेत, २२६ मोबाईल जप्त  
4
रणजी ट्रॉफी स्पर्धेत 'जर्सी' चित्रपटाचा ट्रेलर! मुंबईकरांवर भारी पडला जम्मू-काश्मीरचा ४० वर्षीय कॅप्टन
5
डीएसएलआर कॅमेऱ्याला टक्कर देणारी ओप्पो फाइंड एक्स ९ सीरीज लॉन्च; जाणून घ्या किंमत!
6
सलग दुसऱ्या सेंच्युरीसह एलिसा हीलीनं पा़डला बांगलादेशचा बुक्का; ऑस्ट्रेलियाला मिळालं सेमीचं पहिलं तिकीट
7
Gujarat Cabinet Resignation: भाजपने गुजरातमधील सर्व मंत्र्यांचे राजीनामे का घेतले, आता पुढे काय घडणार?
8
टी-२० विश्वचषक २०२६ साठी पात्र ठरलेले सर्व २० संघ कोणते? येथे पाहा संपूर्ण यादी
9
वापरली अशी ट्रिक आणि दोन वर्षे फ्रीमध्ये ऑनलाइन ऑर्डर केलं जेवण, बिंग फुटताच...   
10
"इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची" एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
11
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
12
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
13
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
14
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले
15
Bogus Voter: 'त्या' घरात ८०० नव्हे, पाचच सदस्यांचे वास्तव्य; जयंत पाटील यांच्या आरोपात किती सत्यता? काय आढळलं?
16
Video - ऑनलाईन ऑर्डर केलं फूड; डिलिव्हरी बॉयची अवस्था पाहून डोकंच फिरेल, दारू पिऊन...
17
RCB फॅन्स... सावधान!! विराट कोहली IPL मधून निवृत्त होणार? 'या' घटनेमुळे चर्चांना उधाण
18
खेडेगावातील लोकांसाठी परवडणाऱ्या बाईक्स, किंमत ५५ हजारांपासून सुरू; येथे पाहा संपूर्ण लिस्ट
19
Gujarat Cabinet: मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळातील १६ मंत्र्यांनी दिला राजीनामा, गुजरातमध्ये मोठी राजकीय घडामोड
20
"मला सुटी नको, WFH द्या..."; आईच्या अपघातानंतर तरुणीची विनंती, कंपनीचा पुरावे मागत नकार

Kolhapur: पंचगंगा इशारा पातळीकडे; एसटीच्या १८ मार्गावर पाणी, राधानगरी धरण ७५ टक्के भरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 12:05 IST

रात्रभर पाऊस, दिवसभर उघडझाप : ५३ बंधारे पाण्याखाली; वाहतूक विस्कळीत

कोल्हापूर : जिल्ह्यात शुक्रवारी पावसाची उघडझाप असली तरी धरण क्षेत्रात जोरदार कोसळत आहे. राधानगरी धरण ७५ टक्के भरले असून, त्यातून प्रतिसेकंद ७०९४ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पंचगंगा नदी ३३.७ फुटापर्यंत पोहोचली असून, इशारा पातळीकडे आगेकूच केल्याने कोल्हापूरकरांची काळजी वाढली आहे. विविध नद्यांवरील ५३ बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.गुरुवारी दिवसभर पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. रात्रभर एकसारखा पाऊस कोसळत राहिला, शुक्रवारी सकाळपासून पावसाने उसंत घेतली असली तरी धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणांच्या पातळीत वाढ होत असून, राधानगरी धरण ७५ टक्के, तुळशी ७० टक्के, वारणा ७९ टक्के, तर दुधगंगा ५९ टक्के भरले आहे. त्यामुळे सर्वच धरणांतून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने नद्यांच्या पातळीत वाढ होत आहे. शुक्रवारी सकाळ ८ वाजता संपलेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी १९ मिमी पावसाची नोंद झाली असली तरी गगनबावड्यात अतिवृष्टी झाली आहे. शाहूवाडी, पन्हाळा, राधानगरी, भुदरगड, आजरा, चंदगड तालुक्यातही जोरदार पाऊस झाला आहे. पंचगंगेचे पाणी संथ गतीने वाढत असले तरी इशारा (३९ फुटाकडे) पातळीकडे वाटचाल सुरू ठेवल्याने कोल्हापूरकरांची काळजी वाढली आहे.

अलमट्टीतून १ लाख घनफुटाचा विसर्गकोल्हापूर जिल्ह्यात वाढलेल्या पावसामुळे नद्यांच्या पातळीत वाढ होत आहे. अलमट्टी धरणात प्रतिसेकंद ९४ हजार ७६७ घनफूट पाणी येत आहे, तर १ लाख घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नद्यांची पातळी संथ गतीने वाढत आहे.

एसटीच्या १८ मार्गावर पाणीजिल्ह्यात ४ राज्य व ९ प्रमुख जिल्हा मार्गांवर पाणी आहे. त्याचबरोबर एसटीच्या १८ मार्ग पाण्याखाली गेल्याने या मार्गांवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

२१ ठिकाणी पडझड; ७.९५ लाखांचे नुकसानजिल्ह्यात शुक्रवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या चोवीस तासात २१ ठिकाणी खासगी मालमत्तांची पडझड झाली. यामध्ये ७ लाख ९५ हजारांचे नुकसान झाले आहे.