शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईच्या बाबतीत काहीतरी डाव नक्कीच शिजतोय..."; राज ठाकरेंचे 'बॉम्बे' वादावर रोखठोक मत
2
"…तर मी अनंत गर्जेच्या दोन कानाखाली लावल्या असत्या"; पंकजा मुंडेंनी गौरी पालवेंच्या आईवडिलांना काय सांगितलं?
3
"प्रभू श्रीराम सगळ्यांचे... मी दलित म्हणून मला बोलवलं नाही"; अयोध्या खासदाराचा नाराजीचा सूर
4
व्यवहारच अपूर्ण, मुद्रांक शुल्क का भरावे? दंड टाळण्यासाठी ‘अमेडिया’ची पळवाट 
5
Ahilyanagar: मॉर्निंग वॉकला गेलेल्या काँग्रेस जिल्हाध्यक्षाचे अपहरण करून बेदम मारहाण!
6
Apple नंतर ही कम्प्युटर बनवणारी 'ही' दिग्गज कंपनी ६००० कर्मचाऱ्यांची कपात करणार, का घेतला हा मोठा निर्णय?
7
१० वर्षांत १ कोटींचा टप्पा गाठायचा आहे? SIP द्वारे कोणत्या फंडात आणि किती गुंतवणूक करणे फायदेशीर!
8
महालक्ष्मी व्रतकथा: महालक्ष्मी व्रत कथेशिवाय पूजा अपूर्ण; पती-पत्नीने मिळून वाचल्यास मिळते अधिक फळ!
9
घटस्फोट, कौटुंबिक हिंसाचार प्रकरणानंतर सेलिना जेटलीची पहिली पोस्ट; म्हणाली, "माझी मुलं..."
10
मुंबईत थरकाप उडवणारी घटना! अंडी फेकली आणि पाच जणांनी मित्रालाच पेट्रोल टाकून पेटवलं; घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल
11
पगार ५० हजार...तर तुम्हाला किती मिळेल ग्रॅच्युइटी?; जाणून घ्या, नवीन नियम अन् सोपा फॉर्म्युला
12
मार्गशीर्षातला पहिला गुरुवार, महालक्ष्मी व्रताची तयारी झाली का? वाचा साहित्य आणि पूजाविधी
13
गरिबांसाठीच्या योजनांवर १ लाख कोटी रुपयांचा खर्च; लोककल्याणाचा उदात्त हेतू, पण सरकारी तिजोरीवर वाढता ताण
14
Stock Market: ३ दिवसांच्या घसरणीनंतर शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २४५ अंकांनी वधारला; गुंतवणूकदारांमध्ये उत्साह
15
टीम इंडियाची लाजिरवाणी कामगिरी! स्टार क्रिकेटर म्हणाला, 'ही' आमच्यासाठी विन-विन सिच्युएशन ठरेल!
16
आजचे राशीभविष्य, २६ नोव्हेंबर २०२५: 'या' राशींसाठी आहे धनलाभाचा योग; वाचा आपले आजचे राशीभविष्य!
17
पेन्शन, टॅक्स पासून एलपीजी पर्यंत; १ डिसेंबरपासून बदलणार हे महत्त्वाचे नियम, तुमच्यावर थेट होणार परिणाम
18
स्मृती मानधनाच्या वडिलांना रुग्णालयातून डिस्चार्ज; पलाश मुच्छलसोबत लग्न अद्यापही लांबणीवरच!
19
देशाच्या माजी राष्ट्रपतींनाच सुनावली २७ वर्षांची शिक्षा, कुठे घडला प्रकार? काय आहे गुन्हा?
20
धर्मेंद्र यांचा 'हा' सिनेमा आता कधीच चाहत्यांच्या भेटीला येणार नाही; दिग्दर्शकाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यात गगनबावड्यासह चार तालुक्यांत अतिवृष्टी; पंचगंगा पात्राबाहेर, तब्बल ४५ बंधारे पाण्याखाली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 12:12 IST

एसटीचे तीन मार्ग अंशत: बंद

कोल्हापूर : जिल्ह्यात मंगळवारी दिवसभर संततधार सुरू आहे. धरण क्षेत्रातही धुवांधार पाऊस कोसळत असून, गगनबावडा, राधानगरी, भुदरगड, आजरा तालुक्यांत अतिवृष्टी झाली आहे. धरणातील विसर्ग वाढल्याने सर्वच नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत असून, पंचगंगा नदी यंदा पहिल्यांदाच पात्राबाहेर पडली आहे.पंचगंगेची पातळी ३२ फुटांपर्यंत पोहचली असून, दिवसभरात साडेतीन फुटाने पाणी वाढले. विविध नद्यांवरील ४५ बंधारे पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. ‘घटप्रभा’पाठोपाठ गगनबावडा तालुक्यातील ‘कोदे’ धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे.सोमवारपासून पावसाचा जोर वाढला आहे. रात्रभर एकसारखा पाऊस कोसळत आहे. मंगळवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत हवामान विभागाने कोल्हापूर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट दिला होता. त्यामुळे दिवसभर संततधार सुरू राहिली. धरणक्षेत्रात तर धुवांधार पाऊस सुरू आहे. मंगळवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ४० मिलीमीटर पावसाची नोंद झाली असली, तरी चार तालुक्यांत अतिवृष्टी झाली आहे. राधानगरी धरणक्षेत्रात १३९, तर दूधगंगा धरणक्षेत्रात १५१ मिलीमीटर पाऊस झाला आहे. राधानगरी धरणातून प्रतिसेकंद ३१००, तर वारणातून १७०० व दूधगंगेतून १६०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. ‘कोदे’ धरण ०.२१ टीएमसी क्षमतेचे असून, त्यातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. पंचगंगेच्या पातळीत दिवसभरात साडेतीन फुटांनी वाढ झाली.

झडीचा पाऊस अन् गारठावाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळत असल्याने वातावरणात कमालीचा गारठा जाणवत आहे. साधारणत: जुलै-ऑगस्ट महिन्यात अशा प्रकारचा झडीचा पाऊस पडतो. त्याचा अनुभव जून महिन्यातच येत आहे.

‘आर्द्रा’चा जोर..‘मृग’ नक्षत्रातही जोरदार पाऊस काेसळला. रविवारी सूर्याने ‘आर्द्रा’ नक्षत्रात प्रवेश केला आहे. वाहन ‘उंदीर’ असून, या नक्षत्राने सलामीच जोरदार दिली आहे.

एसटीचे तीन मार्ग अंशत: बंदबंधाऱ्यावर पाणी असल्याने अनेक मार्गांवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू असली, तरी एसटीचे तीन मार्ग अंशत: बंद झाले आहेत.