करवीरमध्ये मुसळधार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:20 IST2021-06-04T04:20:08+5:302021-06-04T04:20:08+5:30
कोपार्डे - करवीर तालुक्यात गेले दोन दिवस ढगाळ वातावरण व प्रचंड उष्णता असे वातावरण होते. बुधवारी तालुक्यात अनेक ठिकाणी ...

करवीरमध्ये मुसळधार पाऊस
कोपार्डे - करवीर तालुक्यात गेले दोन दिवस ढगाळ वातावरण व प्रचंड उष्णता असे वातावरण होते. बुधवारी तालुक्यात अनेक ठिकाणी माॅन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली होती. पण अनेक ठिकाणी पावसाने हुलकावणी दिली होती
आज सकाळपासून पुन्हा प्रखर उष्णता व दुपारनंतर ढग आकाशात दाटू लागले. दुपारी साडेतीननंतर सोसाट्याच्या वाऱ्यासह पुन्हा पावसाचे वातावरण निर्माण झाले. विजांचा कडकाटासह पावसाने सुरुवात केली. जवळपास तास दीड तास मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सायंकाळी पाच वाजता पाऊस थांबला. पण साडेपाचनंतर पुन्हा तुरळक पावसाने सुरुवात केली. या मुसळधार पावसामुळे खरिपाच्या पेरणीला गती मिळणार आहे तर उसाला या पावसाने मोठा फायदा होणार आहे.