कोल्हापूर : जिल्ह्यात काल, शुक्रवारी दुपारनंतर जोरदार पावसाने सुरुवात केली, तर कोल्हापूर शहरात रिपरिप सुरू झाली. पावसाचा जोर कमी असला तरी हवेत कमालीचा गारठा जाणवत आहे. आगामी चार दिवस जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.गेल्या आठ दिवस मराठवाड्यासह सोलापूर जिल्ह्यात पावसाने झोडपून काढले आहे. पुराच्या पाण्याने सगळीकडे हाहाकार पसरला असताना, कोल्हापूर जिल्ह्यात मात्र उघडीप राहिली. शुक्रवार सकाळपासून वातावरणात बदल होत गेला. दुपारपर्यंत ढगाळ वातावरण राहिले. आकाश गच्च असले तरी पाऊस नव्हता. दुपारी दीड वाजता कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. हळूहळू पाऊस वाढत गेला आणि एक सारखी रिपरिप सुरू राहिली.पावसाचा जोर कमी असला तरी हवेत कमालीचा गारठा जाणवत होता. त्यामुळे पाऊस जोर पकडण्याची शक्यता आहे. आगामी चार दिवस जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.जिल्ह्यात सोयाबीन व भुईमूग काढणीस आला आहे. पावसाने आता सुरुवात केली असून, आगामी काळात असाच राहिला तर काढणीस आलेल्या पिकांचे मोठे नुकसान होण्याचा धोका आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.दरम्यान, शुक्रवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी ०.८ मिलिमीटर पाऊस झाला असला तरी गगनबावडा तालुक्यात १४.३ मिलिमीटरची नोंद झाली. धरणक्षेत्रात पाऊस कमी असल्याने विसर्ग बंद आहे. त्यामुळे नद्यांच्या पातळीत वाढ दिसत नाही. पंचगंगेची पातळी १३.३ फूट असून दोन बंधारे पाण्याखाली आहेत.
Web Summary : Kolhapur experienced heavy rain after a dry spell. While the city saw drizzle, a noticeable chill prevailed. The weather department predicts continued heavy rainfall for the next two days, raising concerns for harvested soybean and groundnut crops. River levels remain stable despite the rainfall.
Web Summary : कोल्हापुर में सूखे के बाद जोरदार बारिश हुई। शहर में रिमझिम बारिश हुई, लेकिन ठंडक महसूस हुई। मौसम विभाग ने अगले दो दिनों तक भारी बारिश की भविष्यवाणी की है, जिससे काटी गई सोयाबीन और मूंगफली की फसलों को लेकर चिंता बढ़ गई है। बारिश के बावजूद नदी का जलस्तर स्थिर है।