शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
2
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
3
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
4
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
5
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
6
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
7
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
8
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
9
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
10
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
11
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
12
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
13
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
14
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
15
Health Tips: शरीरावर असलेले लाल मोस कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
16
Plane Crash: उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमान कोसळलं; भयानक घटना कॅमेऱ्यात कैद!
17
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
18
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
19
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
20
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका

गगनबावडा, राधानगरीत जोर'धार', कोल्हापूर शहरासह पूर्वेकडील तालुक्यात पाऊस कमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 16:24 IST

उर्वरित जिल्ह्यात उघडझाप : पंचगंगेची पातळी फुटाने झाली कमी

कोल्हापूर : जिल्ह्यात बुधवारी दिवसभर पावसाची उघडझाप सुरू असली तरी गगनबावडा, राधानगरी, पन्हाळा, शाहूवाडी, भुदरगड तालुक्यात पावसाचा जोर आहे. उर्वरित तालुक्यात तुलनेत कमी पाऊस आहे. नद्यांच्या पातळीत घट होऊ लागली असून, पंचगंगा नदीची पातळी  कमी झाली आहे. अद्याप ३८ बंधारे पाण्याखाली असून, या मार्गावरील वाहतूक काहीशी विस्कळीत झाली आहे.जिल्ह्याच्या पश्चिम व दक्षिणेकडील तालुक्यात बुधवारी दिवसभर अधूनमधून जोरदार पाऊस कोसळला. बुधवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी ९.७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असली तरी गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक ४१.५ मिलीमीटर पाऊस झाला. तुलनेत कोल्हापूर शहरासह पूर्वेकडील तालुक्यात पाऊस कमी आहे. तरीही मंगळवार पेक्षा पावसाची भूर भूर अधिक दिसत आहे.धरण क्षेत्रात पाऊस अजूनही दमदार लागत आहे. राधानगरी धरण क्षेत्रात ६९, वारणा २९ तर दुधगंगा धरण क्षेत्रात ४६ मिलीमीटर पाऊस झाला. राधानगरी धरणातून प्रति सेकंद २९२८, वारणातून १३ हजार १९८ तर दूध गंगेतून ५६०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नद्यांची पाणी पातळी हळूहळू कमी होत आहे. पंचगंगेची पातळी दिवसभरात एक फुटाने कमी झाली असून रात्री आठ वाजता ३२.०९ फुटावर पातळी होती.दरम्यान, बुधवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात १४ खासगी मालमत्तांची पडझड होऊन ४ लाख ९८ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.एसटीचे तीन मार्ग बंदजिल्ह्यात पुराच्या पाण्यामुळे ३ राज्य तर ८ प्रमुख जिल्हा मार्ग बंद आहेत. त्याचबरोबर एसटीचे शिरढोण ते कुरुंदवाड, जयसिंगपूर ते धरणगुत्ती, जमखंडी ते कुडची हे तीन मार्गावरील वाहतूक ठप्प आहे.दूधगंगा (काळम्मावाडी) धरणातून ६००० क्युसेक्सने विसर्ग काळम्मावाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे धरणाच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. सांडव्यावरून ४५०० क्युसेक्स व वीजगृहातून १५०० क्युसेक्स असा एकूण ६००० क्युसेक्स पाणीविसर्ग सुरू आहे. परिणामी धरणातील पाणी विसर्गामुळे दूधगंगा नदीपात्रावरील सात बंधारे पाण्याखाली गेले आहेत. धरणातील पाण्याची पातळी २१.२० टीएमसी म्हणजे ८३.११% टक्के इतका पाणीसाठा आहे. सोळांकुर -पंडेवाडी, सुळंबी सावर्डे (जुना बंथारा), मालवे - तुरंबे, वाळवा -चंद्रे बाचणी -वडकशिवाले यासह काही छोटे बंधारे ही पाण्याखाली गेले आहेत.