शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
2
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
3
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
4
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
5
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
6
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
7
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
8
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
9
राज्य कामगार विमा योजनेत नोंदणी नसलेल्यांनी लक्ष द्या...
10
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
11
बंपर लॉटरी लागली! भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
12
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
13
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
14
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
15
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
16
काैटुंबिक कलहातून होतेय कोवळ्या मुलांची हाेरपळ; बदलापुरात मुलीचे अपहरण; मुंब्य्रात आईच बनली क्रूर
17
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?
18
दोस्त दोस्त ना रहा..!   भांडणातून घेतला जीव 
19
तरुणांभोवती ऑनलाइन गेमचा फास; टार्गेट पूर्ण न झाल्याने दाेघांची आत्महत्या
20
खासदारांना 'हेल्दी मेन्यू'द्वारे मिळणार 'ताकद'!

Kolhapur: गगनबावड्यात अतिवृष्टी; पंचगंगेच्या पातळीत पाच फुटाने वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 11:54 IST

वारणा धरणातून विसर्ग वाढवला

कोल्हापूर : जिल्ह्यात मंगळवारी पहाटेपासून पावसाने जोरदार सुरुवात केली. धरण क्षेत्रातही चांगला पाऊस होत असल्याने राधानगरी व दूधगंगा धरणातून विसर्ग कायम असला तरी वारणातून विसर्ग वाढला आहे. नद्यांच्या पातळीत वाढ होत आहे. पंचगंगा नदीची पातळी दिवसभरात तब्बल पाच फुटाने वाढली असून, विविध नद्यांवरील ३१ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. गगनबावडा तालुक्यात तब्बल ११३.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.सोमवारी रात्रीपासून वातावरणात कमालीचा बदल होऊन पावसाच्या सरी कोसळत राहिल्या. मंगळवारी पहाटेपासून तर एकसारख्या पावसाने झोडपून काढले. सकाळी ११ वाजेपर्यंत पाऊस सुरू होता. त्यानंतर उघडीप दिली. पण, अधूनमधून जोरदार सरी कोसळत राहिल्या. मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी ३२.४ मिलीमीटर व पन्हाळ्यात ४४.४ मिमी, शाहूवाडीत ५३.६, राधानगरीत ३२.९, तर गगनबावड्यात ११३.४ मिमी पाऊस झाला.धरण क्षेत्रातही जोरदार पाऊस सुरू असून, राधानगरी धरण क्षेत्रात चोवीस तासांत तब्बल १२१ मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याने पाणीसाठ्यात वाढ होत आहे. राधानगरी धरण ८७ टक्के भरले असून, त्यातून प्रतिसेकंद ३१०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. वारणा धरण ८२ टक्के भरले आहे, त्यातून ८५३०, तर दूधगंगा धरण ७१ टक्के भरल्याने त्यातून १६०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. मंगळवारी सकाळी ८ वाजता पंचगंगा २१ फुटावर होती. रात्री ८ वाजेपर्यंत २६ फुटांच्या वर गेली. दिवसभरात १७ नवीन बंधारे पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक काहीशी विस्कळीत झाली आहे.