शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

मने जुळली अन् सत्तरीत अडकले विवाहबंधनात, धुमधडाक्यात झालेल्या या विवाहसोहळ्याची कोल्हापुरात चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2023 14:11 IST

दु:खाचा पाढा वाचून मन मोकळे करता करता दोन्ही मने जुळली आणि लग्नाच्या बंधनातून एकत्र येण्याचा निर्णय घेतला

गणपती कोळीकुरुंदवाड : वृद्धापकाळात नातेवाईक वाऱ्यावर सोडले की आपल्या आयुष्यातील साथीदार एकमेकांना धीर देत कसेबसे जीवन जगत असतात. मात्र साथीदारालाही दैवाने हिरावून घेतले, तर वृद्धाश्रमाशिवाय पर्याय उरत नाही. घोसरवाड (ता. शिरोळ) येथील जानकी वृद्धाश्रमातील अशाच दोन समदु:खी वृद्ध वयाच्या सत्तरीत विवाह बंधनात अडकले आहेत. त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी वृद्धाश्रमचालक बाबासाहेब पुजारी यांनी कायदेशीर बाबींची पूर्तता करून धूमधडाक्यात लग्न लावून दिल्याने या विवाहाची चर्चा रंगली आहे.अनुसया शिंदे (७०, मूळ रा. वाघोली, जि. पुणे) अशी वृद्ध नववधू, तर वराचे बाबूराव पाटील (७५, रा. शिवनाकवाडी, ता. शिरोळ) असे नाव आहे. दोघेही दोन वर्षांपासून येथील वृद्धाश्रमात आहेत. शरीराने स्वावलंबी असले तरी मानसिकदृष्ट्या खचलेले आहेत. दोघांचेही साथीदार देवाघरी गेले आहेत.

त्यामुळे या समदु:खी वृद्धांनी एकमेकांच्या आयुष्यातील दु:खाचा पाढा वाचून मन मोकळे करता करता दोन्ही मने जुळली आणि लग्नाच्या बंधनातून एकत्र येण्याचा निर्णय घेतला. दोघांचीही तयारी असल्याने व कायदेशीर सल्ला घेऊन गुरुवारी वृद्धाश्रमातच मांडव घालून ग्रामस्थ व प्रमुख लोकांच्या उपस्थितीत धार्मिक विधी पद्धतीने थाटात लग्न लावून देत वृद्धांची इच्छा पूर्ण केली. त्यामुळे या वृद्ध जोडप्यांचा विवाह खूपच चर्चेची गोष्ट ठरली आहे.

मायेचा आधारया लग्नात जात, धर्म नाही की कुंडली नाही. शरीरसुखाची आस नाही की कोणत्याही संपत्ती, हुंड्याची आशा नाही. उर्वरित आयुष्यात एकमेकांच्या सुख-दु:खात सहभागी होऊन एकमेकांना मायेचा आधार असावा इतकीच माफक अपेक्षा या वृद्ध जोडप्याला आहे.

वृद्धांनी स्वखुशीने लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. दोघांनी विचारपूर्वक निर्णय घेतल्याने व कायदेशीर बाबींची पूर्तता करून त्यांची इच्छा पूर्ण करून सहचरणीबरोबर आनंदी जीवन जगण्यासाठी थाटात लग्न करून दिले. लग्नानंतरही वृद्धाश्रमातच राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. - बाबासाहेब पुजारी, वृद्धाश्रम चालक

टॅग्स :kolhapurकोल्हापूरmarriageलग्न