कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) संचालक अपात्रतेबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचकडे दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली. याबाबतची सुनावणी आता ६ एप्रिलला होणार असल्याची माहिती याचिकाकर्ते प्रकाश बेलवाडे यांनी दिली.बेलवाडे म्हणाले, ‘गोकुळ’ दूध संघाच्या संचालकांनी गेल्या पाच वर्षांत आर्थिक अनियमितता केली आहे. वैरण विकास विभागाने खरेदी केलेल्या गवताच्या कांड्या जादा दराने केल्या आहेत. त्याचबरोबर एका संस्थेकडून वसुली करणे अपेक्षित असताना त्यांना माफ केले आहे. यासह शासनाने केलेल्या विशेष लेखापरीक्षण व चाचणी लेखापरीक्षणामध्ये अनेक ठपके ठेवले होते.संचालक मंडळाने कामकाज करताना कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल कोल्हापूर सर्किट बेंचकडे याचिका दाखल केली आहे. यावर सोमवारी सुनावणी झाली, पण विरोधी बाजूने वेळ मागितली. याबाबतची सुनावणी ६ एप्रिलला होणार असल्याचे प्रकाश बेलवाडे यांनी सांगितले.
उद्याच्या सुनावणीकडे संस्थांच्या नजरा‘गोकुळ’ने दिलेल्या मतदार यादीतील ११०८ दूध संस्थांविरोधात प्रकाश बेलवाडे यांनी कोल्हापूर सर्किट बेंचकडे याचिका दाखल केली आहे. बुधवारी झालेल्या सुनावणीत विभागीय सहनिबंधक (दुग्ध) विभागाने मंत्र्यांच्या तारीख नसलेल्या पत्रावर कशी स्थगिती दिली, याबाबत सोमवार (दि. २३)पर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. याबाबतची उद्या, बुधवारी सुनावणी होत आहे. याकडे जिल्ह्यातील संस्थांच्या नजरा लागल्या आहेत.
Web Summary : The Kolhapur court will hear the Gokul director disqualification case on April 6. Petitioners allege financial irregularities and legal violations by the board, including inflated fodder prices and waived dues. A separate petition challenges the voter list; the hearing is tomorrow.
Web Summary : कोल्हापुर कोर्ट 6 अप्रैल को गोकुल संचालक अयोग्यता मामले की सुनवाई करेगा। याचिकाकर्ताओं ने बोर्ड पर वित्तीय अनियमितताओं और कानूनी उल्लंघनों का आरोप लगाया है, जिसमें चारे की कीमतों में वृद्धि और बकाया माफ करना शामिल है। एक अलग याचिका मतदाता सूची को चुनौती देती है; सुनवाई कल है।