आरोग्यवर्धक ‘सफरचंद’

By Admin | Updated: August 11, 2014 00:17 IST2014-08-10T23:45:25+5:302014-08-11T00:17:51+5:30

रोज लागते २० टन सफरचंद : ‘सिमला’ला अधिक पसंती

Healthy 'apple' | आरोग्यवर्धक ‘सफरचंद’

आरोग्यवर्धक ‘सफरचंद’

सचिन भोसले-कोल्हापूर - ‘अ‍ॅन अ‍ॅपल अ डे किपस् द डॉक्टर अवे’ अशी एक इंग्रजी म्हण प्रचलित आहे. रोज एक सफरचंद आहारामध्ये घेतल्यास डॉक्टरांकडे जाण्याची गरजच पडत नाही. सफरचंद नुसते व वेगवेगळ्या पदार्थांमधूनही खाल्ले जाते. जसे सफरचंदाचा रस, तयार आइस्क्रीममधून, पेस्ट, अ‍ॅपल बटर, आदींमध्ये रूपांतरित करून बारमाही खाता येते. अशा या सफरचंदाच्या लागवडीमध्ये भारत पाचव्या क्रमांकावर आहे. सध्या कोल्हापुरात हंगामात दररोज २५ टनांहून अधिक, तर बिगर हंगामात चार टन एवढी आवक होते. हा माल बॉक्सच्या स्वरूपात बाजारात विक्रीसाठी येतो. अशा या सफरचंदाची माहिती ‘लोकमत’संगे जाणून घेऊ.
भारतामध्ये इंडियन, सिमला, काश्मिरी या जाती, तर क््रयाब, गाला, रेड डेलिशियस, ग्रयानी स्मिथ, फुजी, गोल्डलन डेलिशियस, जोना गोल्ड रेनिर्टी, यलो ट्रान्सपुंस्ट, ब्राम्ले, अरकनसास ब्लॅक लोबो, पॅसिफिक रोझ, सॅम्पियन पिंक लेडी अशा जातींची सफरचंद बाजारात येत आहेत. भारतात देशीसह वॉशिंग्टन, चिली, आॅस्ट्रेलिया, न्यूझीलंड या देशांतून ही सफरचंद विक्रीसाठी येतात. भारतीय बाजारात आॅगस्ट ते फेबु्रवारीपर्यंत भारतीय सफरचंद , तर फेबु्रवारी ते जुलै या दरम्यान साऊथ आॅफ्रिकन, न्यूझीलंड, आॅस्ट्रेलियन येथून सफरचंद बाजारात येतात.
हजारो वर्षांपासून सफरचंदाची लागवड आशिया व युरोपमध्ये केली जाते. गेल्या वर्षी ६९ मिलियन टन इतके जगात सफरचंदाचे उत्पादन झाले होते. यामध्ये चीनने निम्म्याहून अधिक उत्पन्न घेतले आहे, तर त्याखालोखाल अमेरिकेचा नंबर लागतो. जागतिक पातळीवर तुर्की, इटली, भारत व पोलंड यांचा क्रमांक लागतो. जेवणानंतर घेतला जाणारा गोड पदार्थ म्हणून सफरचंदाकडे पाहिले जाते. शितपेयांमध्ये सफरचंदाचा वापर वाढला आहे.
सफरचंद लाल पिवळसर, हिरवे, गुलाबी या रंगांतही उपलब्ध आहे. साधारण थंडीच्या महिन्यात सफरचंदाचा बहर येतो.

Web Title: Healthy 'apple'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.