corona virus-आरोग्य विभागाने मास्कची तातडीने खरेदी करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2020 03:38 PM2020-03-06T15:38:13+5:302020-03-06T15:41:50+5:30

सीपीआर रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय, महापालिका वैद्यकीय विभाग आणि जिल्हा परिषद आरोग्य विभागाने कोरोना विषाणूच्या खबरदारीसाठी योग्य ते नियोजन करावे. ‘एन-९५’मास्कची खरेदी करण्याबरोबरच विलगीकरण कक्ष तयार करावेत. खासगी रुग्णालयांमध्येही विलगीकरण कक्ष करण्यासाठी पाहणी करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

The health department should buy the mask immediately | corona virus-आरोग्य विभागाने मास्कची तातडीने खरेदी करावी

corona virus-आरोग्य विभागाने मास्कची तातडीने खरेदी करावी

Next
ठळक मुद्देआरोग्य विभागाने मास्कची तातडीने खरेदी करावीजिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : कोरोनोच्या पातळीवर दक्षता

कोल्हापूर : सीपीआर रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय, महापालिका वैद्यकीय विभाग आणि जिल्हा परिषद आरोग्य विभागाने कोरोना विषाणूच्या खबरदारीसाठी योग्य ते नियोजन करावे. ‘एन-९५’मास्कची खरेदी करण्याबरोबरच विलगीकरण कक्ष तयार करावेत. खासगी रुग्णालयांमध्येही विलगीकरण कक्ष करण्यासाठी पाहणी करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व समितीची बैठक झाली. त्यास महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी देसाई यांनी सुरुवातीलाच आरोग्य विभागाच्या तयारीबाबत आढावा घेतला. एकूण ३४ विलगीकरण कक्ष तयार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिली.

जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, ‘पहिल्या टप्प्यात किमान १०० बेड विलगीकरण कक्षाची तयारी ठेवावी. त्यादृष्टीने खासगी रुग्णालयांची पाहणी करून यादी तयार करावी. पर्यटक अथवा बाहेरून येणाऱ्या व्यक्तींबाबत विशेष काळजी घ्यावी. ‘एन-९५’मास्कचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्यासाठी त्याची खरेदी करावी. वृत्तपत्रे, आकाशवाणीवरून उपाययोजना याबाबतची जनजागृती करावी. नागरिकांमध्ये भीती पसरणार नाही याची काळजी घ्यावी.

 

Web Title: The health department should buy the mask immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.