शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
4
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
5
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
6
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
7
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
8
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
9
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
10
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
11
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
12
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
13
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
14
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
15
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
16
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
17
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
18
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
19
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
20
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

आठवड्यातून एक दिवस केवळ महिलांची आरोग्य तपासणी, कोल्हापूर जिल्हा परिषदेचा उपक्रम 

By समीर देशपांडे | Updated: January 2, 2025 18:44 IST

प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात ‘पिंक ओपीडी’

समीर देशपांडेकोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून नव्या वर्षात ‘पिंक ओपीडी’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांच्या संकल्पनेतून या उपक्रमांतर्गत प्रत्येक आठवड्याला प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात एका दिवशी केवळ बालिका, युवती आणि महिलांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.जिल्ह्यातील बाराही तालुक्यांत ७७ प्राथमिक आरोग्य केंद्रे कार्यरत आहेत. बहुतांशी ही आरोग्य केंद्रे पंचक्रोशीतील मोठ्या गावांमध्येच कार्यरत असल्याने साहजिकच या ठिकाणी रुग्णांची मोठी गर्दी असते. त्यामुळे अनेक वेळा रुग्णांना तपासणीसाठी विलंब होण्याची शक्यता असते. अशातच महिला, पुरुष्, बालके यांच्या एकत्रित तपासणीतून सर्वच घटकांना सेवा देण्यास विलंब होतो. अनेक ठिकाणी महिला रुग्णांना पुरुष मंडळीच घेऊन तपासणीसाठी येतात. या विलंबामुळे सर्वांचाच या ठिकाणी वेळ जातो.आपल्याकडे महिला वर्ग हा शेतीकामासाठीही मोठ्या प्रमाणावर जातो. त्यामुळे महिला रुग्णांसोबत महिला आल्यास त्यांच्याही कामाचा खोळंबा होतो. यातून पर्याय म्हणून कार्तिकेयन यांनी ‘पिंक ओपीडी’ ही संकल्पना मांडली आहे. त्यानुसार आठवड्यातील एक दिवस केवळ महिलांचीच आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. याचा अर्थ इतर वेळी तपासणी होणार नाही असा नाही. इतर वेळी अत्यावश्यक उपचारासाठी महिला रुग्ण आल्यास उपचार होणारच आहेत; परंतु ठरलेल्या दिवशी प्रामुख्याने महिलांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.या दिवशी प्रामुख्याने महिला डॉक्टरांंची उपस्थिती ठेवण्यासाठीही प्रयत्न केले जातील, तसेच गरज पडल्यास त्या दिवशी मानसोपचारतज्ज्ञ, युवतींसाठी समुपदेशन ठेवण्याचेही नियोजन करण्यात येणार आहे. यासाठी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्या त्या तालुक्यातील ‘पिंक ओपीडी’चे दिवस ठरवण्याच्या सूचना देण्यात आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांनी सांगितले.

महिलांच्या आरोग्याला प्राधान्यआजारपण अंगावर काढण्याची महिलांची मानसिकता असते. त्यातून अनेक आजारांचे उशिरा निदान होते; परंतु ‘पिंक ओपीडी’च्या माध्यमातून आरोग्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून महिलांनी आरोग्य केंद्रात येऊन तपासणी करून घ्यावी यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्यांच्या नियमित आरोग्य तपासणीपासून ते कॅन्सरसह अन्य आजारांच्या निदानाबाबत तपासणी करून महिलांचे आरोग्य निकोप राहावे यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरzpजिल्हा परिषदHealthआरोग्यWomenमहिलाhospitalहॉस्पिटल