शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मुख्याध्यापक ठार, मांगुर-बेनाडी रोडवर अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 13:32 IST

सासरवाडीला दूचाकीवरुन जात असताना मांगुर-बेनाडी (ता. चिक्कोडी) रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या मुख्याध्यापकाचा खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना मंगळवारी पहाटे मृत्यू झाला. भाऊसो आण्णासो रांगोळे (वय ३८, रा. पट्टणकोडोली, ता. हातकणंगले) असे त्यांचे नाव आहे. त्यांचा पाच वर्षाचा मुलगा अरव हा जखमी असून त्याचेवर उपचार सुरु आहेत.

ठळक मुद्देअपघातात मुख्याध्यापक ठार, मांगुर-बेनाडी रोडवर अज्ञात वाहनाची दूचाकीला धडक

कोल्हापूर : सासरवाडीला दूचाकीवरुन जात असताना मांगुर-बेनाडी (ता. चिक्कोडी) रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या मुख्याध्यापकाचा खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना मंगळवारी पहाटे मृत्यू झाला. भाऊसो आण्णासो रांगोळे (वय ३८, रा. पट्टणकोडोली, ता. हातकणंगले) असे त्यांचे नाव आहे. त्यांचा पाच वर्षाचा मुलगा अरव हा जखमी असून त्याचेवर उपचार सुरु आहेत.अधिक माहिती अशी, भाऊसो रांगोळे हे कासा-पाटीलपाडा (ता. डहाणु, जि. पालघर) येथे आदिवासी शाळेमध्ये मुख्याध्यापक होते. १ मे रोजी त्यांचा जिल्हा परिषदेने आदर्श शिक्षक म्हणून सत्कार केला. उन्हाळी सुट्टी पडल्याने ते पत्नी व मुलगा असे मिळून गावी पट्टणकोडोली येथे आले होते. त्यांची पत्नी माहेरी बेनाडी-कर्नाटक येथे गेल्या होत्या. त्यामुळे ते रविवारी रात्री दूचाकीवरुन मुलगा अरव याला घेवून बेनाडीला निघाले. मांगुर-बेनाडी रोडवर अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. बापलेक दोघेही जागेवर बेशुध्द पडले.

या मार्गावरुन जाणाऱ्या वाहनधारकांनी त्यांना कोल्हापुरातील राजारामपुरी परिसरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. डोक्याला गंभीर मार लागल्याने भाऊसो रांगोळे यांचा मंगळवारी उपचार सुरु असताना मृत्यू झाला. त्यांचा मुलगा अरव हा जखमी असून त्याचेवर उपचार सुरु आहेत. वडील मृत झालेची कल्पनाही त्याला दिलेली नाही. मनमिळावू आणि नेहमी सहतमुख भाऊसो यांच्या अपघाती मृत्यूने पट्टणकोडोली गावावर शोककळा पसरली. 

 

टॅग्स :Accidentअपघातkolhapurकोल्हापूर