शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur News: बोहल्यावर चढण्यापूर्वीच काळाचा घाला, विजेच्या धक्क्याने तरुण वायरमनचा मृत्यू झाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2023 17:29 IST

महावितरणच्या खांबावर काम करताना विजेचा धक्का बसला

गगनबावडा : महावितरणच्या खांबावर काम करत असताना विजेचा धक्का बसल्याने कंत्राटी वायरमनचा मृत्यू झाला. गगनबावडा तालुक्यातील पळसंबेपैकी मानेवाडी येथे आज दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. अमित प्रकाश माने (वय २५ वर्षे), रा. पळसंबे असे तरुणाचे नाव आहे.याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, महावितरण कंपनीच्या गगनबावडा उपविभागांतर्गत येणाऱ्या पळसंबे या गावात अमित माने हा वीज वितरणचा कंत्राटी वायरमन म्हणून गेली अनेक वर्षे काम करत होता. आज दुपारी तो वीजपुरवठा दुरुस्त करण्यासाठी विजेच्या खांबावर चढला असता त्याला विजेचा जोराचा धक्का बसला. अमितला उपचारासाठी गगनबावडा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. 

तालुक्यातील आसपासच्या ग्रामस्थांनी गगनबावडा उपविभागीय महावितरण कार्यालयावर धाव घेतली. ही घटना वीज वितरण कार्यालयाच्या गलथान कारभारामुळे घडल्यांचा आक्षेप घेत संबंधित कर्मचाऱ्यासह जबाबदार अधिकाऱ्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. महावितरणचे वरिष्ठ अधिकारी गगनबावडा येथे येऊन ठोस आश्वासन देत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका जमावाने घेत ठिय्या आंदोलन केले. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये यासाठी गगनबावड्याचे सहायक पोलिस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी मोठा फौजफाटा मागवून घेतला. घटना घडून पाच तास उलटले तरी वरिष्ठ कार्यालयाचे अधिकारी गगनबावडा कार्यालयाजवळ पोहोचू शकले नव्हते. त्यामुळे जमाव संतप्त झाला.कोल्हापूर ग्रामीणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता साळी हे रात्री साडेसातच्या सुमारास दाखल झाले. त्यांनी दिलेले आश्वासन अमान्य झाल्यामुळे रात्री नऊ वाजेपर्यंत कोणताही तोडगा निघाला नाही. संतप्त जमावाला वीज वितरण कडून कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्यामुळे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी जमाव पोलिस स्टेशनकडे वळला. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.बोहल्यावर चढण्यापूर्वीच काळाचा घालामयत अमित याचा दोनच दिवसांपूर्वी विवाह ठरला होता. विवाह मुळे त्याच्या घरात उत्साहाचे वातावरण होते. मात्र, बोहल्यावर चढण्यापूर्वीच आज त्याच्यावर काळाने घाला घातला. त्याच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. अमित याच्या पश्चात आई, वडील व एक विवाहित बहीण आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरmahavitaranमहावितरणelectricityवीजDeathमृत्यू