आम्ही एकत्र आल्यावर काय होते, हे दाखवून दिले : जयंत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:57 IST2020-12-05T04:57:44+5:302020-12-05T04:57:44+5:30
सांगली : राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना एकत्र आल्यावर काय घडते, हे या निकालाने दाखवून दिले. राज्यातील शेतकरी, कष्टकरी, कामगार, मध्यमवर्गीय ...

आम्ही एकत्र आल्यावर काय होते, हे दाखवून दिले : जयंत पाटील
सांगली : राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना एकत्र आल्यावर काय घडते, हे या निकालाने दाखवून दिले. राज्यातील शेतकरी, कष्टकरी, कामगार, मध्यमवर्गीय यांच्यासोबत उच्चशिक्षित मतदारदेखील आमच्यासोबत ठामपणे उभे आहेत हेच निकालातून सिद्ध होते, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी शुक्रवारी दिली.
महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या सहा जागांपैकी चार जागांवर महाविकास आघाडीने विजय मिळविल्यानंतर जयंत पाटील यांनी ट्विट करीत मत मांडले. ते म्हणाले, महाविकास आघाडीच्या उमेदवारांना या निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळाले. जनमताचा हा कौल आम्ही नम्रपणे स्वीकारत आहोत. हा विजय मी महाविकास आघाडीसाठी कष्ट घेणाऱ्या कार्यकर्त्यांना व मतदारांना समर्पित करतो. महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस एकत्र आल्यानंतर काय होते, हेसुद्धा या निकालाने दाखवून दिले. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांतील व मित्रपक्षांतील सर्व कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचे तसेच महाराष्ट्रातील जनतेचे मी आभार मानतो.