शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

अवघे ५५ हजार देऊन संचकारपत्रावर ट्रक लांबविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 14:34 IST

Crime, sataranews, kolhapurnews, police फायनान्स कंपनीचे कर्ज भरण्याचे आमिष दाखवून अवघे ५५ हजार रुपये आगाऊ रक्कम देऊन ट्रक घेऊन पसार होणाऱ्या भामट्यावर शाहूपुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. बनावट नावाचा आधार घेत संचकारपत्र करून त्याने हे फसवणुकीचे कृत्य केले. अजिम सलीम पठाण (रा. रहिमतपूर, कोरेगाव, सातारा) असे त्या संशयिताचे नाव आहे.

ठळक मुद्देसातारच्या भामट्यावर शाहूपुरीत गुन्हाबनावट नावाचा वापर करून घातला गंडा

कोल्हापूर : फायनान्स कंपनीचे कर्ज भरण्याचे आमिष दाखवून अवघे ५५ हजार रुपये आगाऊ रक्कम देऊन ट्रक घेऊन पसार होणाऱ्या भामट्यावर शाहूपुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. बनावट नावाचा आधार घेत संचकारपत्र करून त्याने हे फसवणुकीचे कृत्य केले. अजिम सलीम पठाण (रा. रहिमतपूर, कोरेगाव, सातारा) असे त्या संशयिताचे नाव आहे.पोलिसांनी दिलेली माहिती, विजय हिंदुराव पाटील (रा. शहापूर, इचलकरंजी) यांनी २०१९ मध्ये जुना ट्रक खरेदी केला होता. त्यांनी तो शेजारील रोहित खटावकर यांना वापरण्यास दिला. ट्रकवर फायनान्स कंपनीकडून १२ लाख ५० हजारांचे कर्ज होते पण कर्ज परतफेडीत अडचणी आल्याने ट्रक विक्रीस काढला. खटावकर यांनी त्याची जाहिरात फेसबुकवर टाकली.जाहिरात वाचून मोबाईलवर समीर शेख नावाच्या व्यक्तीने खटावकरकडे ट्रकबाबत चौकशी केली. त्यानंतर दि. २ सप्टेंबरला मध्यवर्ती बसस्थानक येथे व्यवहार होऊन पाटील यांना ॲडव्हान्सपोटी ५५ हजार रुपये दिले. त्याचे संचकारपत्र (नोटरी) केले. त्याने ट्रक नेताना फायनान्स कंपनीचे कर्ज पुढील १५ दिवसांत फेडण्याचे आश्वासन दिले.

पुढे पंधरा दिवसांनंतर त्याने वेगवेगळी कारणे सांगून पाटील यांना टोलविले. त्यानंतर त्याचा फोन बंद झाल्याने पाटील यांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांनी नोटरीवरील पत्ता घेऊन ते करंडी (मेढा ता. जावळी जि. सातारा) येथे गेले, पण तेथे समीर शेख नावाची व्यक्तीच नसल्याचे आढळले.

पोलीस ठाण्यातून त्याचे खरे नाव अजीम सलीम पठाण (रा. रहिमतपूर, ता, कोरेगाव, जि. सातारा) असे असल्याचे समजले. त्यामुळे पाटील यांनी फसवणुकीबाबत संशयित पठाण याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला.सातारा पोलिसांतही ठकसेनाबाबत तक्रारसंबंधित ठकसेनाने आणखी एकाच्या ट्रकचा अपहार केल्याची बातमी सातारा येथील एका वृत्तपत्रात दि. १९ ऑक्टोबरला प्रसिद्ध झाली. त्यावरून पाटील यांनी सातारा तालुका पोलीस ठाणे गाजले, तेथे तोच ठकसेन असल्याचे फोटोत ओळखले तेथेच त्याचे खरे नाव पाटील यांना समजले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूरSatara areaसातारा परिसरPoliceपोलिस