फेरीवाला बांधवांनी चुकीच्या आंदोलनात सहभागी होऊ नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:04 IST2021-01-13T05:04:34+5:302021-01-13T05:04:34+5:30
कोल्हापूर : केंद्र सरकारने केलेल्या कृषी सुधारणा कायद्याच्या विरोधात सर्वपक्षीय फेरीवाला कृती समिती निदर्शने करणार असल्याचे समजते. मात्र फेरीवाला ...

फेरीवाला बांधवांनी चुकीच्या आंदोलनात सहभागी होऊ नये
कोल्हापूर : केंद्र सरकारने केलेल्या कृषी सुधारणा कायद्याच्या विरोधात सर्वपक्षीय फेरीवाला कृती समिती निदर्शने करणार असल्याचे समजते. मात्र फेरीवाला बांधवांनी या चुकीच्या आंदोलनात सहभागी होऊ नये, असे आवाहन भारतीय जनता पार्टी फेरीवाला संघटनेने केले आहे.
सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडून व लोकशाही मार्गाने केंद्र सरकारने कृषी सुधारणा कायदे केले. कोव्हिड-१९ लॉकडाऊन काळात ज्यांचे व्यवसाय पूर्ण बंदच झाले, अशा हातावरचे पोट असणाऱ्या फेरीवाल्यांसाठीही मोदी सरकारने पंतप्रधान स्वनिधी योजनेमार्फत अर्थसहाय्य केले. कोल्हापुरातील सुमारे ४५०० फेरीवाला बांधवांना याचा लाभ झाला आहे.
फेरीवाल्यांचे नेते म्हणून घेणारे कोल्हापुरातील काही कार्यकर्ते फेरीवाल्यांना हाताशी धरून राजकीय फायद्यासाठी वापर करत आहेत. यातील काहीजणांनी तर पंतप्रधान स्वनिधी योजना फेरीवाल्यांपर्यन्त पोहोचू नये, यासाठी कष्ट केल्याचे उघड झाले आहे.