गडहिंग्लज तालुक्यात कोरोनाचा कहर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:23 IST2021-05-01T04:23:14+5:302021-05-01T04:23:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क गडहिंग्लज : गडहिंग्लज शहर व तालुक्यात दुसऱ्या लाटेत कोरोनाचा कहर झाला आहे. शुक्रवारी (३०) रोजी एका ...

गडहिंग्लज तालुक्यात कोरोनाचा कहर
लोकमत न्यूज नेटवर्क
गडहिंग्लज : गडहिंग्लज शहर व तालुक्यात दुसऱ्या लाटेत कोरोनाचा कहर झाला आहे. शुक्रवारी (३०) रोजी एका दिवसात तब्बल ६५ नवे रूग्ण आढळले. त्यापैकी गडहिंग्लज शहरात २९ तर ग्रामीण भागात ३६ रूग्ण आढळले.
गावनिहाय रूग्णसंख्या अशी : कडगाव (८), भडगाव, ऐनापूर, औरनाळ (प्रत्येकी ३) शिप्पूर तर्फ आजरा, करंबळी, कुंबळहाळ व महागाव (प्रत्येकी २), बेळगुंदी, दुंडगे, हिडदुगी, हुनगिनहाळ, नरेवाडी, निलजी, बसर्गे, हिरलगे, नूल, हलकर्णी व हडलगे (प्रत्येकी १). आजअखेर ६७४ रूग्ण आढळले असून, एकूण २६ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ३५० रूग्णांवर उपचार सुरू असून, २९४ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
औषध दुकानदार व कामगार बाधित
गडहिंग्लज पालिकेच्या खास पथकाने दोन दिवसात शहरातील १३ औषध दुकानदार आणि कामगार मिळून ५० जणांची रॅपिड टेस्ट केली. त्यात एका दुकानाचे मालक व कामगाराचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे ते दुकान काही दिवसांसाठी बंद ठेवण्यात आले आहे.
------------------------