हातकणंगले सभापतींचा राजीनामा अध्यक्षांकडून मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:21 IST2020-12-24T04:21:23+5:302020-12-24T04:21:23+5:30
कोल्हापूर : हातकणंगले पंचायत समितीचे सभापती महेश उर्फ दरगोंडा बसगोंडा पाटील यांनी बुधवारी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील यांच्याकडे ...

हातकणंगले सभापतींचा राजीनामा अध्यक्षांकडून मंजूर
कोल्हापूर : हातकणंगले पंचायत समितीचे सभापती महेश उर्फ दरगोंडा बसगोंडा पाटील यांनी बुधवारी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील यांच्याकडे समक्ष भेटून राजीनामा दिला. पाटील यांनी तो तातडीने मंजूर करून मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्याकडे पाठवला.
ठरवून दिलेला कालावधी पूर्ण होऊनही पाटील यांनी राजीनामा न दिल्याने पंचायत समितीच्या २२ पैकी १६ सदस्यांनी हातकणंगले तहसीलदारांकडे १४ डिसेंबर रोजी अविश्वास ठराव दाखल केला होता. त्यानुसार तो मंजुरीसाठी आणि अविश्वास ठराव प्रक्रियेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात आला. त्यामुळे आता ही प्रक्रिया सुरू झाली आहे.
आमदार प्रकाश आवाडे गटाच्या ताराराणी आघाडीचे सदस्य असलेल्या पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी आवाडे यांच्याकडे राजीनामा दिला. त्यांच्याच सुचनेनुसार अखेर पाटील यांनी बुधवारी दुपारी जिल्हा परिषदेत अध्यक्ष बजरंग पाटील यांच्याकडे समक्ष येऊन पदाचा राजीनामा दिला. यानंतर पाटील यांनी तो मंजूर करून सामान्य प्रशासन विभागाच्या माध्यमातून मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्याकडे पाठवला. आता तो जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात येणार आहे.