पीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे हाथरसचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 17:57 IST2020-10-06T17:55:41+5:302020-10-06T17:57:17+5:30
Hathras Gangrape, kolhapurnews,yogigoverment पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे मंगळवारी दुपारी दसरा चौकातील शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर योगी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. हाथरसमधील अत्याचाराची घटना निंदनीय असून, नराधमांना कठोर शिक्षा करण्याऐवजी त्यांना पाठीशी घालण्याचे काम करणाऱ्या उत्तर प्रदेश सरकारच्या राजीनाम्याचीही मागणी केली.

हाथरसमधील घटनेच्या निषेधार्थ पिपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने मंगळवारी दुपारी कोल्हापुरातील दसरा चौकात रस्त्यावर उतरत जोरदार निदर्शने केली. (छाया : नसीर अत्तार)
कोल्हापूर : पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे मंगळवारी दुपारी दसरा चौकातील शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर योगी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. हाथरसमधील अत्याचाराची घटना निंदनीय असून, नराधमांना कठोर शिक्षा करण्याऐवजी त्यांना पाठीशी घालण्याचे काम करणाऱ्या उत्तर प्रदेश सरकारच्या राजीनाम्याचीही मागणी केली.
पीपल्स रिपब्लिकनचे जिल्हाध्यक्ष दगडू भास्कर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. यावेळी बोलताना भास्कर यांनी उत्तरप्रदेशात महिला अत्याचारांच्या घटना वाढत असतानाही योगी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार सत्तेच्या मस्तीत दंग आहे.
देशभर संतापाची लाट उसळली असतानाही योगी यांची यंत्रणा मात्र या पीडित दलित कुटुंबीयांना धमकावण्यात आणि सरकारी यंत्रणेंचा गैरवापर करण्यात गुंतली आहे. अत्याचार झालेल्यांना न्याय देण्याऐवजी अत्याचार केलेल्यांनाच पाठीशी घालण्याचे काम योगींकडून होत आहे, हे दुदैर्वी ओहे, असा संताप व्यक्त करीत कठोर कारवाईची आणि पीडितेला न्यायाची मागणी केली.
आंदोलनात नंदकुमार गोंधळी, विद्याधर कांबळे, लता नागावकर, सोमनाथ घोडेराव, सुरेश सावर्डेकर, रमेश पाचगावकर, रतन कांबळे, निवास सडोलीकर, वाय. के. कांबळे, विलास भास्कर यांच्यासह कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.