हातकणंगले सभापती निवड चिठ्ठीद्वारे

By Admin | Updated: March 9, 2017 00:02 IST2017-03-09T00:02:41+5:302017-03-09T00:02:41+5:30

समान बलाबल : रेश्मा सनदी, मेहरनिगा जमादार यांच्यात लढत

Hathkangalale Speaker Selection Chitdi | हातकणंगले सभापती निवड चिठ्ठीद्वारे

हातकणंगले सभापती निवड चिठ्ठीद्वारे

आयुब मुल्ला --खोची--खोची : हातकणंगले पंचायत समिती सभापती निवडीचा निर्णय हा अपक्ष सदस्यांवर अवलंबून आहे. भाजप-जनसुराज्यने ११ सदस्यांपर्यंतचा आकडा गाठला आहे. त्यांना एका सदस्याची गरज आहे. तर भाजप-जनसुराज्यला सत्तेपासून रोखण्यासाठी विरोधकांनी आपली एकी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सत्तेसाठी दोघांनाही एका मताची गरज पडणार आहे. अशावेळी चिठ्ठीद्वारे निवडप्रक्रिया होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तालुक्याचा सभापती चिठ्ठीतूनच निश्चित होईल. तालुक्यात २२ पंचायत समिती सदस्य आहेत. निवडणुकीसाठी भाजप-जनसुराज्यने युती केली होती. सर्वाधिक सहा जागा भाजपने जिंकल्या. जनसुराज्यचा पाच जागांवर विजय झाला. आवाडे गटाच्या म्हणजे कोल्हापूर जिल्हा ताराराणी विकास आघाडीच्या पाच, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दोन, शिवसेना दोन, कॉँग्रेस एक, असे उमेदवार विजयी झाले. त्यांचे एकूण संख्याबळ दहा होते. तर एक अपक्ष सदस्यही त्यांच्या ऐक्यात सहभागी होणार आहे. त्यामुळे एकमेकांचे संख्याबळ प्रत्येकी ११ होते. दोघांनाही एका मताची गरज आहे. पण, सद्य:स्थितीत असेच संख्याबळ राहणार आहे. त्यामुळे चिठ्ठीद्वारे निवड हाच प्रधान मुद्दा बनला आहे.
सभापतिपद ओबीसी महिला वर्गासाठी आरक्षित आहे. यामध्ये भाजपच्या कबनूर पूर्वमधून रेश्मा सनदी, हुपरी उत्तरमधून वैजयंती आंबी विजयी झालेल्या उमेदवार सभापतिपदाच्या दावेदार आहेत. तर विरोधी गटाकडून हेर्लेमधून अपक्ष निवडून आलेल्या मेहरनिगा जमादार या दावेदार समजल्या जातात. बहुमत असलेल्या भाजप-जनसुराज्यला सत्ता स्थापन करण्याची संधी आहे. पण, त्यांना अपक्ष सदस्यांची गरज आहे; परंतु अपक्ष सदस्य संघटना, शिवसेना यांच्याबरोबर विजयी झाली आहे. त्यामुळे त्यांना या सर्वांबरोबरच राहावे लागणार आहे. त्यातच त्यांना सभापतिपदाची उमेदवारी यांच्याकडून मिळणार आहे. त्यामुळे सर्वाधिक हित येथेच आहे. या सर्वांमुळे दोन्ही बाजूंकडे संख्याबळ समान म्हणजे प्रत्येकी ११ राहणार आहे. अशा परिस्थितीत चिठ्ठीद्वारेच तालुक्याचा सभापती निश्चित होणार आहे.
भाजपच्या रेश्मा सनदी या दुसऱ्यांदा विजयी झाल्या आहेत. आमदार हाळवणकर यांच्या त्या समर्थक आहेत. त्यामुळे सभापतिपदासाठी भाजपकडून त्यांचे नाव आघाडीवर आहे. तर आवाडे गट, संघटना, शिवसेना, कॉँग्रेस यांच्या ऐक्यातून अपक्ष मेहरनिगा जमादार यांचे नाव निश्चित आहे. त्यामुळे रेश्मा सनदी व महेरनिगा जमादार यांच्यात सभापतिपदाची लढाई होणार हे मात्र स्पष्ट आहे.

Web Title: Hathkangalale Speaker Selection Chitdi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.