हसन मुश्रीफ संकटग्रस्त जनतेचे आधारवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:26 IST2021-07-30T04:26:48+5:302021-07-30T04:26:48+5:30
* दुर्घटनाग्रस्त जाधव कुटुंबीयांना मुश्रीफ फाैंडेशनकडून एक लाखाची मदत साके : ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ हे गोरगरीब व संकटग्रस्त जनतेचे ...

हसन मुश्रीफ संकटग्रस्त जनतेचे आधारवड
* दुर्घटनाग्रस्त जाधव कुटुंबीयांना मुश्रीफ फाैंडेशनकडून एक लाखाची मदत
साके : ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ हे गोरगरीब व संकटग्रस्त जनतेचे आधारवड आहेत, असे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी केले. बाचणी (ता. कागल) येथील दुर्घटनाग्रस्त जाधव कुटुंबीयांना नामदार हसन मुश्रीफ फाैंडेशनच्यावतीने रोहित पवार व ‘गोकुळ’चे संचालक नवीद मुश्रीफ यांच्याहस्ते एक लाखांची ठेवपावती देण्यात आली.
गीता गौतम जाधव व हर्षवर्धन गौतम जाधव हे आठवड्यापूर्वी कपडे धुण्यासाठी गेले असता, वीजवाहिनी अंगावर पडून या माय-लेकराचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेच्या दुसऱ्याच दिवशी मंत्री मुश्रीफ यांनी या कुटुंबीयांचे सांत्वन करून आकस्मिक मदतीसह भक्तीच्या उच्च शिक्षणाची जबाबदारी घेतली. त्यानुसार नामदार हसन मुश्रीफ फाैंडेशनच्यावतीने एक लाख रुपयांची ठेव केडीसीसी बँकेत ठेवून ठेवपावती देण्यात आली.
यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप ऊर्फ भैया माने, माजी सरपंच सूर्यकांत पाटील, जिल्हा परिषद सदस्य मनोज फराकटे, शशिकांत खोत, निवास पाटील, प्रकाश पाटील, पांडुरंग पाटील - तात्या, सरपंच इक्बाल नायकवडी, सुभाष चौगुले, मारुती दौलू पाटील, उत्तम चौगुले, नामदेव सडोलकर, पीटर डिसोझा आदी प्रमुख उपस्थित होते.
चौकट..
जनतेशी नाळ जोडलेले नेते
आमदार रोहित पवार म्हणाले, जनतेवर कोणतेही संकट आले की, मंत्री हसन मुश्रीफ त्यांना हिमालयाएवढा आधार देण्यासाठी धावून जातात. सर्वसामान्य, गोरगरीब जनता हाच त्यांचा गोतावळा झाला आहे. गोरगरीब जनतेशी त्यांची नाळ घट्ट जोडलेली आहे.
फोटो ओळी
बाचणी (ता. कागल) येथील जाधव कुटुंबीयांना नामदार हसन मुश्रीफ फाैंडेशनच्यावतीने आर्थिक मदतीची ठेवपावती आमदार रोहित पवार, नवीद मुश्रीफ, प्रताप ऊर्फ भैया माने, मनोजभाऊ फराकटे, सूर्यकांत पाटील आदींच्या उपस्थितीत देण्यात आली.
२९ बाचणी रोहित पवार