हसन मुश्रीफ, के. पी. पाटील यांनी मला नेहमी फसवलं; आगामी विधानसभा लढवणारच : ए. वाय. पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2024 03:21 PM2024-03-01T15:21:27+5:302024-03-01T15:22:02+5:30

के. पी. पाटील कार्यकर्त्यांना आमिषे दाखवत आहेत

Hasan Mushrif, K. P. Patil always cheated me; Will contest the upcoming Assembly election saya A. Y. Patil | हसन मुश्रीफ, के. पी. पाटील यांनी मला नेहमी फसवलं; आगामी विधानसभा लढवणारच : ए. वाय. पाटील 

हसन मुश्रीफ, के. पी. पाटील यांनी मला नेहमी फसवलं; आगामी विधानसभा लढवणारच : ए. वाय. पाटील 

अमर मगदूम 

राशिवडे : समाजकारण, राजकारण करत असताना मी नेहमी राष्ट्रवादी पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले. सर्व सामान्य कार्यर्त्याला मोठा करण्यासाठी घरावर तुळशी पत्र ठेवले, पायाला पाने बांधून नेहमी पक्षनिष्ठा ठेवली. राष्ट्रवादी मोठी करण्यासाठी दिवस रात्र राबलो, शेवटी पालकमंत्री हसन मुश्रीफ व माजी आमदार के. पी. पाटील यांनी मला विधानसभा व बिद्री कारखान्याचे अध्यक्षपदाचा शब्द देत नेहमी फसवले. माझं राजकारण संपविण्याचे काम केले. त्यामुळेच राधानगरी भूदरगड तालूक्याच्या विकासासाठी आगामी विधानसभा लढवणार असल्याचे मत राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी व्यक्त केले. ते सोळांकूर (ता. राधानगरी) येथील राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना बोलत होते.

काल ए. वाय. पाटील समर्थकांनी पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ व बिद्रीचे अध्यक्ष के. पी. पाटील यांच्या गटात प्रवेश केल्याच्या पार्श्वभूमीवर हा कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला होता. पाटील पुढे म्हणाले, बिद्रीत झालेल्या पराभवात पाठीशी न राहता ज्यांना आम्ही पद देत त्यांना मोठे केले, तेच लोक माझ्या पडत्या काळात सोडून गेले हे मोठे दुःख आहे. या लोकांना जनता माफ करणार नाही. आतापर्यंत वैयक्तिक विचार न करता सर्व सामान्यांच्या हितासाठी राजकारण केले. स्वाभिमानी जनतेच्या विश्वासावर व कार्यकर्त्यांच्या पाठबळावर आगामी २०२४ विधानसभेची निवडणूक लढणारच असे जाहीर केले.

भोगावतीचे उपाध्यक्ष राजेंद्र कवडे, भोगावतीचे विद्यमान संचालक अविनाश उर्फ नंदू भाऊ पाटील, मानसिंग पाटील, महादेव कोथळकर, नेताजी पाटील, विलास हळदे यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी डी. बी. पाटील, मोहन पाटील, के. डी. चौगले, दिपक पाटील, अमर पाटील, विजय तौदकर, बाळासो धोंड, भुदरगड तालुक्यातील कार्यकार्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

कार्यकर्त्यांना आमिषे

सत्तेचा गैरवापर करीत बिद्रीचे अध्यक्ष के. पी. पाटील कार्यकर्त्यांना आमिषे दाखवत आहेत. अनेकांना वेगवेगळी खोटी आश्वासने देवून झुलवत आहेत. 

नव्वद दिवसांत नोकर भरतीचे काय झाले

बिद्री साखर कारखान्याच्या निवडणूकीत के. पी. पाटील केवळ मते मिळविण्यासाठी नव्वद दिवसाच्या आत नोकरी भरती करणार असे आश्वासन दिले होते. त्यामध्ये साठ दिवस पूर्ण झाले, तरी देखील नोकर भरतीच्या कोणत्याच हालचाली चालू नाहीत. बिद्रीच्या नोकरी भरतीचे अश्वासन देवून सत्ता मिळवली पण सभासदांचा विश्वासघात केला.

Web Title: Hasan Mushrif, K. P. Patil always cheated me; Will contest the upcoming Assembly election saya A. Y. Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.